Sonakshi Sinha SAKAL
Premier

Sonakshi Sinha: लेकीच्या लग्नाबाबत अफवा पसरवणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हांनी केलं "खामोश", लग्नाला राहणार का उपस्थित? अखेर मौन सोडलं

Shatrughan Sinha Wedding: सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) हे सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार नाहीत, असं म्हटलं जात होतं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे.

priyanka kulkarni

Shatrughan Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, असं म्हटलं जात आहे. सोनाक्षी आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. पण सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) हे सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार नाहीत, असं म्हटलं जात होतं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. अशातच एका मुलाखतीत या सर्व चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. ते म्हणाले, "हे माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचे आयुष्य आहे, तिचा मला खूप अभिमान आहे आणि ती मला खूप आवडते. मी तिचा आधारस्तंभ आहे, असं तिचं मत आहे. मी तिच्या लग्नात नक्कीच उपस्थित राहीन."

"मी अजूनही मुंबईतच आहे. मी इथे फक्त तिचा आधारस्तंभ म्हणून नाही तर तिचं सुरक्षा कवच ​​(कवच) म्हणूनही इथे आहे. सोनाक्षी आणि झहीरला एकत्र आयुष्य जगायचे आहे. ते एकत्र खूप छान दिसतात.", असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं.

सोनाक्षीच्या लग्नाबाबत पसरणाऱ्या फेक बातम्यांबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "फेक बातम्या पसरवणाऱ्यांना मी माझ्या स्टाईलनं उत्तर देऊ इच्छितो, खामोश! तुम्ही तुमचे काम करा, स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या"

सोनाक्षी आणि झहीर हे 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी 2022 मध्ये रिलीज झालेल्या डबल XL या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT