shatrughna sinha  sakal
Premier

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू, मुलगा लव्हने धुडकावल्या सर्जरीच्या बातम्या

Shatrughan Sinha Hospitalised: अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Payal Naik

Shatrughan Sinha Health Update: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबतीत एक मोठी बातमी समोर येते आहे. अभिनेत्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर सर्जरी झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र ती बातमी खोटी असल्याचं अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा याने दिली आहे. त्याने सर्जरीच्या साऱ्या बातम्या धुडकावून लावल्या आहेत. मी इथे आहे त्यामुळे मला जास्त माहितीये की त्यांना काय झालंय असं तो म्हणाला. तर शत्रुघ्न यांना तापाची लागण झाली आहे. त्यांचा ताप खूप वाढल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं.

पीटीआयशी बोलताना लव्ह सिन्हा म्हणाला, 'त्यांना खूप जास्त ताप आला होता. त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. त्यांची प्रकृती आणखी गंभीर होण्यापूर्वी आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मी रोज हॉस्पिटलमध्ये जातोय. डॉक्टरांशी बोलतोय. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांच्यावर कोणतीही सर्जरी झालेली नाही.' शत्रुघ्न सिन्हा हे ७७ वर्षांचे आहेत. त्यांनी सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सोनाक्षी आणि झहीर यांनी शुक्रवारी त्यांची रुग्णालयात भेट घेतली होती. त्यांची प्रकृती आता कशी आहे याबद्दल लव्हने माहिती दिलेली नाही. चाहते आता शत्रुघ्न यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. त्यांनी 'काला पथ्थर', 'विश्वनाथ', 'मेरे अपने', 'कालीचरण', 'दोस्ताना' यांसारख्या चित्रपटात काम केलं. त्यांच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT