Income Tax Raid at Shilpa Shetty’s Mumbai Residence

 

esakal

Premier

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

Shilpa Shetty's Mumbai home raided by Income Tax department : सध्या शिल्पा शेट्टी किंवा तिच्या कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

Mayur Ratnaparkhe

Income Tax raid at Shilpa Shetty’s Mumbai home : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढतच आहेत. आता तिच्या मुंबईतील घरी आज(गुरुवार) आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या बास्टियन रेस्टॉरंटशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि कथित कर अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे.

हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक, उत्पन्न आणि कर भरण्यात अनियमितता असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. सध्या शिल्पा शेट्टी किंवा तिच्या कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई स्पष्ट होईल.

 प्राप्त माहितीनुसार, सकाळपासूनच शिल्पा शेट्टीच्या घरी आणि संबंधित ठिकाणी आयकर विभागाच्या विविध पथकांनी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. याशिवाय मुंबई व्यतिरिक्त, बंगळुरूमध्येही छापे टाकण्यात आले आहेत, जिथे रेस्टॉरंट आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या आर्थिक नोंदींची तपासणी केली जात आहे.

बुधवारी बंगळुरू पोलिसांनी बास्टियनसह दोन रेस्टॉरंट्सविरुद्ध निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू राहिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. तर बास्टियन गार्डन सिटी रेस्टॉरंटमध्ये शिल्पा शेट्टीची ५० टक्के हिस्सेदारी असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT