shiv shakti pooja at ambani house  
Premier

Anant Radhika Wedding: भस्म, दुधाचा अभिषेक अन्... अंबानींच्या शिवशक्ती पूजेचा व्हिडिओ पाहून नेटकरी भारावले, म्हणतात- उगीच नाही देव

Shiv Shakti Pooja At Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील शिव शक्ती पूजेचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

Payal Naik

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. तो राधिका मर्चंट हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा विवाह पार पडणार आहे, या लग्नासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. राधिका आणि अनंत यांच्या लग्नापूर्वी अनेक विधी पार पडले. मेहेंदी, हळद, गरबा नाइट आणि गृह शांती पूजादेखील झाली आहे. अशीच अंबानी कुटुंबाकडून लग्नापूर्वी शिव शक्ती पूजादेखील करण्यात आली होती. आता त्या पूजेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी संपूर्ण कुटुंबाचं कौतुक करत आहेत. त्यांचा भक्तिभाव आणि त्या व्हिडिओतील वातावरण भारावून टाकणारं आहे.

या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंब शिव आणि शक्तीची पूजा करताना दिसत आहे. सुरुवातीलाच भगवान शंकरांची भली मोठी पिंड दिसते. त्यानंतर अंबानी कुटुंबीय हनुमंताची पूजा करताना दिसतात. सगळे भक्तिभावाने शक्तीची म्हणजे माता पार्वतीची पूजा करताना दिसतायत. त्यानंतर आरतीची होते. सगळेजण हातात आरतीचं ताट घेऊन आरती म्हणत आहेत. याप्रसंगी होमदेखील करण्यात आला आहे. कुटुंबातील प्रत्येक सध्या या होमात एक एक वस्तू अर्पण करताना दिसतो. त्यानंतर नीता अंबानी, मुकेश अंबानी आणि अनंत तिघे शंकराच्या पिंडीवर भस्म, दूध आणि पाण्याचा अभिषेक करताना दिसत आहेत.

या पूजेसाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींना रुद्राक्षाची माळ दिली जातेय. सगळेच मनोभावे देवाची पूजा करताना दिसत आहेत. शेवटी सगळे हात उंचावून हर हर महादेव म्हणताना दिसतात. त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही भारावले आहेत. तिथलं वातावरण पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. या कुटुंबाची भक्ती वाखाणण्याजोगी आहे. देवाच्या कार्यात कोणतीही कमी त्यांनी ठेवलेली नाही. त्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे, उगीच देव त्यांच्यावर प्रसन्न नाहीये, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT