shiv veena  sakal
Premier

Shiv- Veena: शिव ठाकरे- वीणा जगतापमध्ये सोशल मीडिया वॉर? एक्स गर्लफ्रेंडच्या पोस्टनंतर शिवने दिली प्रेमाची कबुली

Shiv Thakare Veena jagatap Cold War: लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने शेअर केलेली पोस्ट आता लक्ष वेधून घेतेय.

Payal Naik

'बिग बॉस मराठी २' मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय स्पर्धक शिव ठाकरे आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या वागण्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्याला पाहून अनेक जण या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित झाले. तो 'बिग बॉस मराठी २'चा विजेता ठरला. त्यादरम्यान शिव आणि अभिनेत्री वीणा जगताप प्रेमात होते. त्यांच्या रिलेशनशिपच्या प्रचंड चर्चा होत्या. मात्र काही कारणांमुळे ते वेगळे झाले. मात्र आता शिव आणि वीणा यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे त्या दोघांच्या पोस्ट. वीणाने एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर शिवने उत्तर देत प्रेमाची कबुली दिली आहे.

वीणासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता शिव पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. शिवने काही तासांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यात तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. तो तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. तिचा चेहरा त्याने लपवला असला तरी एकूणच त्याने प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र ही मुलगी नेमकी कोण आहे हे समजू शकलेलं नाही. त्याची पोस्ट मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच शिवने हा फोटो शेअर कारण्यापूवी वीणाने देखील एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे शिवची पोस्ट वीणाला उत्तर देण्यासाठी होती का असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

shiv thackare girlfriend

शिवच्या पोस्टच्या काही तास आधी वीणाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एक मुलगी दिसत आहे. आणि या फोटोवर लिहिलंय, 'कितीही एकटी पडले तरी काही हरकत नाही पण टॉक्सिक व्यक्तींना मी माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ देणार नाही.' आता शिवप्रमाणेच वीणाची ही पोस्टही व्हायरल झाली आहे. या सगळ्यामुळे त्यांच्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

veena jagtap

शिव आणि वीणा हे काही काळासाठी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शेवटी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते दोघे कधीही एकत्र दिसले नाहीत. त्यानंतर शिव 'रोडीज', 'बिग बॉस हिंदी', 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात दिसला तर वीणाने देखील काही मालिकांमध्ये भूमिका केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT