shiv thakare  esakal
Premier

तुझ्यामते 'बिग बॉस मराठी ५' कोण जिंकेल? शिव ठाकरेने घेतली दोन नावं; म्हणाला- गेमचा विचार केला तर...

Shiv Thakre Want This Contestant To Win Bigg Boss Marathi 5: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता कोण होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' ने यावेळेस सर्वाधिक टीआरपी मिळवत नवा रेकॉर्ड केला. ६ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यात आता सहा स्पर्धक घरात बाकी आहेत. मात्र नुकतीच 'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरे याने सीझन ५ मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा घरातील प्रत्येक स्पर्धकाला घराबाहेर आणत त्यांचा इथवरचा प्रवास दाखवण्यात आला. या कार्यादरम्यान, सगळ्या स्पर्धकांबरोबर शिव ठाकरे उपस्थित होता. त्याने हा सीझन सुपरहिट झाल्याचं सर्व सदस्यांना सांगितलं.त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने हा सीझन कुणी जिंकायला पाहिजे याचं उत्तर दिलं आहे.

कोण जिंकणार हा शो?

शिवने कार्यक्रमानंतर लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. तेव्हा त्याला हा सीझन कोण जिंकेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना शिव म्हणाला, 'यंदाचा सीझन जिंकण्याची शक्यता कोणाची जास्त आहे हे मी तुम्हाला आता सांगतो, मला वैयक्तिक असं वाटतं की, प्रेक्षकांच्या मतांनुसार सूरज हा शो जिंकेल. पण, गेमचा विचार केला तर अभिजीत सावंतने हा शो जिंकला पाहिजे. मला हे दोघेही आवडतात. कारण, यांच्यातला एक जण (अभिजीत) खूप नीट, कोणतीही लाइन क्रॉस न करता खेळला आहे. याशिवाय सूरजबद्दल सांगायचं झालं तर, त्याला गेम काय असतो हे माहितीच नव्हतं, त्याला षडयंत्र वगैरे या गोष्टी माहिती नव्हत्या. त्यामुळे तो लोकांना जास्त आवडतो.'

विचार करून व्होटिंग करा

तो पुढे म्हणाला, 'असं पाहिलं तर सूरजला गरज जास्त आहे. कारण, यामुळे सूरजचं आयुष्य बदलून जाऊ शकतं. अभिजीत दादा तर आधीच लेजेंड आहेत. माझ्या मते यांच्यापैकी कोणीतरी जिकलं पाहिजे. निक्की तर आधीच प्लेअर आहे कारण, आधी एक ‘बिग बॉस’ ती करून आलीये. घरातल्या बाकीच्यांना ज्या हव्या आहेत त्या गोष्टी मिळाल्या आहेत. एकंदर ट्रॉफी सूरजच्या हातात येईल कारण, गावागावांत त्याला खूप पाठिंबा आहे, आपुलकी आहे. पण, जर चांगल्या खेळाचा विचार केला तर अभिजीत सावंत…आता प्रेक्षकांनी विचार करून व्होटिंग करा…तुमचा निर्णय आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईतील रेल्वेट्रॅक पाण्याखाली, पावसाने शहर ठप्प! घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा...

'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'

Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी

Rule 72 Explained: तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होणार? Rule No. 72 सांगतोय तुमचं आर्थिक भविष्य

Dahi Handi 2025 Celebration: गो गो गोविंदा...! दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी 'या' सेफ्टी टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT