Marathi actors got House in mhada lottery  esakal
Premier

शिव ठाकरे ते गौरव मोरे, 'या' मराठी कलाकारांना मिळालं म्हाडाच्या लॉटरीत घर, वाचा कुणाला कुठे मिळाला फ्लॅट

Marathi Celebrity Wons Mhada Lottery 2024: मराठी कलाकारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. गोरेगावमधील एका घरासाठी २७ कलाकारांचे अर्ज आले होते.

Payal Naik

मुंबईत घर घेण्याचं अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. मुंबई म्हणजे मायानगरी, पोटापाण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला इथे आपल्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं असं वाटतं. जे सर्वसामान्यांचं तेच कलाकारांचं. म्हाडा दरवर्षी काहीश्या कमी किमतीत घर उपलब्ध करू देतं. त्यात लॉटरी सिस्टीमने घर देण्यात येतं. त्यामुळे अनेकांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होतं. यात कलाकारांसाठीही वेगळा कोटा असतो. या कलाकार कोट्यातून दरवेळी अनेक कलाकार म्हाडाच्या घरासाठी अर्ज करतात. यावेळेसही अनेक कलाकारांनी कलाकार कोट्यातून घरासाठी अर्ज केला होता. त्यातील काही कलाकारांना त्यांच्या हक्काचं घरदेखील मिळालं आहे. कोण आहेत ते कलाकार चला जाणून घेऊया.

कुणाला कुठे मिळाला फ्लॅट

आता नुकत्याच काढलेल्या म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री गौतमी देशपांडे, गौरव मोरे , शिव ठाकरे यांना घर मिळाल्याचं समोर आलंय. म्हाडाच्या लॉटरीत कन्नमवार नगरमधील घर हे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने याला मिळालंयपवई परिसरातलं एक घर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे तर दुसरं घर बिग बॉस फेम शिव ठाकरेला मिळालं आहे. या दोघांना मिळालेल्या उच्च श्रेणीतील घरांची किंमत ही १ कोटी ८० लाखांच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे. म्हाडाच्या गोरेगाव मधील दोन घरांसाठी तब्बल २७ कलाकारांनी अर्ज केले होते. त्यामुळं ते दोन कलाकार कोण असणार याबद्दल उत्सुकता होती. आता त्यांची नाव समोर आली आहेत. गोरेगावचं एक घर अभिनेत्री माझा होशील ना मालिका फेम गौतमी देशपांडे हिला मिळालं आहे.

गौतमी, गौरव, शिव आणि निखिल या चार कलाकारांना म्हाडाच्या लॉटरीत घरं मिळाली आहेत. त्याची किंमतही बरीच मोठी आहे. ८ ऑक्टोबर रोजी या घरांची सोडत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT