Shivani Sonar And Ambar Ganpule esakal
Premier

Shivani Sonar And Ambar Ganpule: आणि त्या क्षणी शिवानी लाजली.... शिवानी-अंबरच्या साखरपुड्याच्या व्हिडीओनं वेधलं लक्ष

Shivani Sonar And Ambar Ganpule: नुकताच शिवानीने तिच्या साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

priyanka kulkarni

Shivani Sonar And Ambar Ganpule: अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अभिनेता अंबर गणपुलेचा (Ambar Ganpule) साखरपुडा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पार पडला. त्यांच्या या सिक्रेट साखरपुड्याने सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच शिवानीने त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

'And the adventure begins 💫' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय . साखरपुड्याच्या विधीवेळेचा शिवानीचा लूक, एकमेकांना अंगठी घालतानाचे त्या दोघांचे रोमँटिक क्षण गोष्टींनी सगळ्यांचं सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं. शिवानी आणि अंबरने केलेला डान्सही अनेकांना पसंत पडला. तर त्यांच्या मित्रांचं चिडवणं, डान्स करणंही सगळ्यांनी एन्जॉय केलं. अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं.

पाहा व्हिडीओ:

साखरपुड्याच्या विधीसाठी शिवानीने भगव्या आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी नेसली होती. त्यावर टेम्पल ज्वेलरी, मिनिमम मेकअप असा लूक तिने केला होता तर अंबरने शिवानीच्या साडीला मॅचिंग असा क्रीम कुर्ता त्यावर गडद हिरव्या रंगाचं जॅकेट आणि पॅन्ट असा लूक त्याने केला होता.

शिवानी सध्या 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेत तिने साकारलेली सिंधुताई सपकाळ यांची व्यक्तिरेखा सगळ्यांनाच पसंत पडली आहे. तर अंबरने स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम केलं होतं. अनेकांना त्याची या मालिकेतील भूमिका आवडली होती. त्यानंतर त्याने झी मराठीवरील 'लोकमान्य' या मालिकेतही काम केलं होतं. या मालिकेत त्याने साकारलेले समाजसुधारक आगरकर ही भूमिकाही अनेकांना आवडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT