Stree 2 Poster Esakal
Premier

Stree 2 Teaser : ओ स्त्री रक्षा करना ! श्रद्धा राजकुमारच्या बहुप्रतीक्षित स्त्री 2 चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस

Stree 2 teaser Out : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित स्त्री 2चा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

Stree 2 : राजकुमार राव (RajKummar Rao) , श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री' (Stree) या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं आणि सगळ्यांना प्रतीक्षा होती ती या सिनेमाच्या सिक्वेलची. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून स्त्री 2 (Stree 2) चा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. सस्पेन्स आणि थ्रिलने पुरेपूर असलेल्या या टीझरची चर्चा सोशल मीडियावर सध्या रंगली आहे.

भन्नाट टीझर आणि श्रद्धाची चर्चा

काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झालेल्या या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेहडून घेतलं असून श्रद्धा आणि राजकुमारच्या भन्नाट अभिनयाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा चंदेरी गावचे रहिवासी आणि स्त्री यांच्यातील लढ्याची गोष्ट पाहायला मिळणार असून या टीझरने सगळ्यांचं मन जिंकलं आहे.

टीझरमध्ये चंदेरी गावातील सगळे पुरुष स्त्रीच्या मूर्तीवर अभिषेक करताना पाहायला मिळत आहेत. पण काही दिवसांतच स्त्री परत येते आणि गावातील पुरुषांवर हल्ला करायला सुरुवात करते तर श्रद्धाचाही वेगळा अंदाज या टीझर मध्ये पाहायला मिळतोय. श्रद्धाचं स्त्री आहे कि स्त्री नेमकी दुसरीच कोणीतरी आहे याची गोष्ट सिक्वेलमध्ये उलगडेल असा अंदाज आहे. टीझरच्या शेवटी असलेला राजकुमारचा स्त्रीच्या डोक्याचा मसाज करून देण्याचा संवाद सगळ्यांचं मन जिंकतोय. एकूणच स्त्री 2च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

'स्त्री'ची कास्ट

या सिनेमात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), राजकुमार राव (RajKummar Rao), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana), अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांची मुख्य भूमिका आहे. तर अमर कौशिक यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पुन्हा एकदा सचिन आणि जिगर (Sachin-Jigar) हा सिनेमा संगीतबद्ध करणार असून ज्योती देशपांडे (Jyoti Deshpande) यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

रिलीज डेट

हा बहुप्रतीक्षित सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत. टीझरलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT