Shraddha Kapoor sakal
Premier

Shraddha Kapoor: श्रद्धा करतेय 'या' व्यक्तीला डेट; फोटोमुळे रंगली सोशल मीडियावर चर्चा

Shraddha Kapoor Viral Photo: सोशल मीडियावर सध्या श्रद्धाचा एक फोटो व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे तिचं लव्ह लाईफ चर्चेत आलंय.

priyanka kulkarni

Shraddha Kapoor: अल्पावधीतच सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) कायमच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आता श्रद्धा रिलेशनशलिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या तिचा एक फोटो व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे तिचं लव्ह लाईफ चर्चेत आलंय.

नुकतंच श्रद्धाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये श्रद्धा पहाडी भागात व्हेकेशनला गेल्याच दिसून येतंय. खिडकीत बसलेली श्रद्धा आणि मागे बर्फाळ डोंगर हा तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजतोय पण त्यासोबतच आणखी एक फोटो व्हायरल झालाय. श्रद्धाचा तथाकथित बॉयफ्रेंड राहुल मोदीचा फोटोही चर्चेत आहे. राहुलनेही शेअर केलेल्या फोटोमध्ये सारखा बॅकग्राऊंड दिसतोय. त्यामुळे ते दोघं एकत्र फिरायला गेल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

श्रद्धा आणि राहुल गेला काही काळ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीत आहेत. राहुल हा 'तू झुठी में मक्कार' या सिनेमाचा दिग्दर्शक आहे.

हिंदुस्थान टाईम्स च्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल आणि श्रद्धा एकमेकांना डेट करत असून ते इतक्यात तरी त्यांचं नात पुढे नेण्याचा विचार करत नाहीयेत. त्यांचं नातं आता मजबूत झालं असून त्याचे एकत्र फोटोग्राफ्स काढायला त्यांची काहीही हरकत नसली तरीही अजून ते लग्न कधी करणार यावर त्यांनी विचार केला नाहीये.

या आधी ही जोडी अनंत अंबानीच्या प्री वेडिंग कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यानंतरही ते अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यांच्या डिनर डेटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

प्रोफेशनल फ्रंटवर श्रद्धाचा गेल्या वर्षी तू झूठी में मक्कार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. तर आता ती स्त्री 2 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आधी तिचे स्त्री, आशिकी 2, बागी, एबीसीडी 2 हे सिनेमे गाजलर होते. याशिवाय श्रद्धाचे मराठी बोलतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

SCROLL FOR NEXT