Shraddha Kapoor Esakal
Premier

Shraddha Kapoor : अखेर लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं उत्तर, म्हणते "जेव्हा नवरी बनायचंय..."

Shraddha Kapoor talked about her marriage plans : स्त्री सिनेमाच्या ट्रेलर लाँचला श्रद्धा कपूरने तिच्या लग्नाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम, Prerana Jangam

Shraddha Kapoor Interview : सध्या श्रद्धा कपूर आणि बॉयफ्रेंड राहुल मोदी यांच्या अफेअरची जोरदार चर्चा असताना या लाँच सोहळ्यात श्रद्धाला याविषयी प्रश्न विचारण्यात आले. श्रद्धाला थेट लग्नाचाच प्रश्न यावेळी विचारला गेला. मग काय श्रद्धाने देखील हटके अंदाजात फार वेळ न घेता पटकन उत्तर दिलं. श्रद्धाला यावेळी विचारण्यात आलं कि ती खऱ्या आयुष्यात नवरी कधी बनणार आहे. या प्रश्नावर श्रद्धाने मिश्किल अंदाजात चित्रपटातील डायलॉगचा आधार घेत उत्तर दिलं. श्रद्धा यावेळी म्हटली की, "ती स्त्री आहे तिला जेव्हा नवरी बनायचय तेव्हा ती बनेल." श्रद्धाच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. श्रद्धाने प्रसंगावधान साधत मोठ्या हुशारीने या प्रश्नाचं उत्तर दिलं.

सध्या बॉलीवुडमधील बऱ्याच कपल्सनी त्यांची लग्न उरकली. त्यातच श्रद्धा आणि राहुल मोदी यांचं अफेअर प्रकाशझोतात आलय. अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलय. तर स्वत: श्रद्धा कपूरने देखील पहिल्यांदाच सोशल मिडीयावर राहुलसोबतचा फोटो देखील शेयर केला होता. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी उधाण आलय.

'तू झुठी मै मक्कार' या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांची जवळीक वाढली होती. राहुल हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या जामनगर येथील प्री वेडिंग कार्यक्रमात श्रद्धा आणि राहुल यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या लग्नाच्या कार्यक्रमासाठी जाताना एअरपोर्टवर देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.

श्रद्धाने तिच्या इ्न्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर राहुलसोबतचा फोटो पोस्ट करुन दोघांच्या रिलेशनबद्दलची कबुली दिली होती. तिने या पोस्टमध्ये लिहीलं होतं की, "माझं ह्रदय तुझ्याकडे ठेव, पण झोप तरी परत दे." यासोबतच श्रद्धाने राहुलसोबतचा खास सेल्फि पोस्ट केला होता. श्रद्धाचे चाहते मात्र तिचे राहुलसोबत आणखी फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी उत्सुक असतील एवढं नक्की. आता श्रद्धा लग्न कधी करतेय यासाठी तिच्या पुढील उत्तराची वाट बघावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT