Shreya Ghoshal Esakal
Premier

Shreya Ghoshal : आईच्या कॉन्सर्टमध्ये लेकाची धमाल ; दिव्यानची मस्ती आणि बोबडे बोल झाले व्हायरल , श्रेयाच्या मुलाचा व्हिडीओ चर्चेत

Shreya Ghoshal Son's Video Went Viral : गायिका श्रेया घोषालच्या लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shreya Ghoshal & Devyaan Mukhopadhyaya : आपल्या सुंदर आवाजाने आणि सुमधुर गायकीने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) आजवर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सोशल मीडियावरही श्रेया बरीच सक्रिय असून यावरून ती तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याचे अपडेट्स शेअर करत असते. पण सध्या श्रेयाची नाही तर श्रेयाच्या चिमुरड्या लेकाने दिव्यानने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दिव्यानचा व्हिडीओ व्हायरल

श्रेयाने नुकतीच तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवर ऑकलंड येथे पार पडलेल्या तिच्या कॉन्सर्टची झलक शेअर केली. पण या व्हिडिओमधील श्रेयाच्या कॉन्सर्टच्या हायलाईट्सपेक्षा दिव्यानच्या मस्तीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या कॉन्सर्टला श्रेयाच्या संपूर्ण कुटूंबाने हजेरी लावली होती. कॉन्सर्टआधी दिव्यानने बॅकस्टेज खूप मजा केली. इतकंच नाही तर श्रेयाचं कॉन्सर्ट संपल्यानंतर त्याने 'यु डिड इट' म्हणत श्रेयाच्या परफॉर्मन्सचं कौतुकही केलं. त्याचे बोबडे बोल, आई-मुलाचा बॉण्ड आणि त्याची मस्ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

लक्षवेधी कॅप्शन

श्रेयाने या व्हिडीओला खूप सुंदर कॅप्शन दिलं आहे. "एक मुलगी मोठं स्वप्न बघू शकते आणि ते सत्यात उतरवू शकते तेव्हाच जेव्हा तिची सगळी लोक, सगळं कुटूंब तिच्याबरोबर खंबीरपणे सगळ्या चढउतारांमध्ये उभं असतं. याबाबतीत मी खरच खूप भाग्यवान आहे. जो भी है सब मेरा तेरे हवाले कर दिया."

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

श्रेयाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिच्या या व्हिडिओचं कौतुक केलं. तिचा आणि दिव्यानचा बॉण्ड सगळ्यांना आवडला. अनेकांनी कमेंट करत त्याच्या निरागसपणाचं कौतुक केलं आणि त्याला आशीर्वाद दिले. दिव्यानने आईप्रमाणेच संगीतक्षेत्रात करिअर करावं अशी इच्छाही अनेकांनी व्यक्त केली.

श्रेया सध्या परदेशात लाईव्ह कॉन्स्टर्स करत असून यंदाच्या तिच्या दौऱ्याला तिने ऑल हार्ट्स टूर असं नाव दिलं आहे. अनेक देशांमध्ये श्रेया लाईव्ह परफॉर्मन्स देणार असून तिच्या भाऊ सौम्यदीपसुद्धा (Soumyadeep Ghoshal) तिच्या बरोबर परफॉर्म करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT