Shruti Haasan esakal
Premier

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Shruti Haasan: श्रुती आणि शंतनू यांच्या ब्रेकअपची चर्चा सध्या का होत आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Shruti Haasan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्रुतीचे शंतनू हजारिकासोबत (Shantanu Hazarika) ब्रेकअप झालं आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. चार वर्षाच्या रिलेशनशिपनंतर आता श्रुती आणि शंतनू यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. श्रुती आणि शंतनू यांच्या ब्रेकअपची चर्चा सध्या का होत आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

'या' कारणामुळे होतीये शंतनू आणि श्रुतीच्या ब्रेकअपची चर्चा

शंतनू आणि श्रुतीच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर होत आहे कारण, दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो केले. शंतनूसोबतचे रोमँटिक फोटो श्रुतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हटवले आहेत.

चार वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट

श्रुती आणि शंतनू जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते. ते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होते.

शंतनू आणि श्रुती यांनी अजून त्यांच्या ब्रेकअपबद्दल कोणतीही माहिती अथवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही.

जाणून घ्या शंतनू हजारिकाबद्दल..

शंतनू हा एक प्रसिद्ध डूडल आर्टिस्ट आहे. त्याने Raftaar, Divine आणि Ritviz यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.

श्रुती हासन शेवटचा सालार हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनीही मुख्य भूमिका साकारली होती. सालारने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. श्रुतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT