subhankar tawde  sakal
Premier

अभिनेते सुनील तावडे यांच्या होणाऱ्या सुनबाईंना पाहिलंत का? लेक शुभंकरने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला खास फोटो

Subhankar Tawde Girlfriend: लोकप्रिय मराठी अभिनेते सुनील तावडे यांच्या मुलाने अखेर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Payal Naik

गेल्या वर्षभरात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली तर अनेकांनी आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. आता या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं जाणार आहे. लोकप्रिय अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आणि अभिनेता शुभंकर तावडे याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना चकीत केलं आहे. आता चाहते त्यांच्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

शुभंकरने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये अभिनय करत स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कायमच कौतुक केलं. वडिलांच्या नावाचा वापर न करता त्याने स्वतःच्या मेहनतीवर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आता त्याने त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शुभंकरने प्रेमाची कबुली देत त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव समीक्षा टक्के असून ती लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आहे. शुभंकरने तिच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं,' तू आहेस. जेव्हा आनंद सांत्वनाची जागा घेतं.'

समीक्षा सोशल मीडियावर कॉमेडी, लाईफस्टाइल, फॅशन आणि स्पोर्ट्स या विषयावर वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या रील्सला तुफान लाईक आणि कमेंट्स मिळतात. याशिवायतीने तिने अनेक भारतीय क्रिकेटर्सच्या मुलाखती घेतल्या आहेत. ती स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहे. शुभंकर याच्या पोस्टवर आता चाहते आणि कलाकारही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याने 'फ्रेशर्स'; या मालिकेतून त्याच्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तो 'डबलसीट' , 'कागर', 'वेड', 'कन्नी' या चित्रपटांमध्ये दिसला. त्याची 'काळे धंदे' ही वेबसीरिजही खूप गाजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT