Mahi Vij shared memory of Siddharth Shukla Esakal
Premier

Sidharth Shukla : अभिनेत्री माही विजचा मोठा खुलासा ; मृत्यूपूर्वी झाली होती सिद्धार्थ शुक्लाशी भेट , अखेरच्या भेटीत तो म्हणाला..

Mahi Vij revealed she met Sidharth before his sad demise : अभिनेत्री माही विजने सिद्धार्थ आणि तिची मृत्यूपूर्वी भेट झाल्याचा खुलासा केला. सिद्धार्थ तिच्याशी अखेरचं काय बोलला जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Mahij Vij On Sidharth Shukla : बिग बॉस हिंदी सीजन १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्याच्या अचानक निघून जाण्याने त्याच्या चाहत्यांना आणि मित्र-मंडळींना खूप मोठा धक्का बसला. नुकतंच एका मुलाखतीत त्याची मैत्रीण माही विजने त्याच्याविषयीच्या अनेक आठवणी शेअर केल्या. यावेळी तिने सिद्धार्थचा मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशी ती त्याला भेटली होती असा खुलासा तिने केला.

माहीने नुकतीच फिल्मीज्ञान या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिला सिद्धार्थ शुक्लाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली,"सिद्धार्थ आणि माझी ओळख खतरों के खिलाडी या शो दरम्यान झाली. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. त्या शोमध्ये झालेला तो माझा एकमेव मित्र होता. सिद्धार्थ आणि मी शो नंतरही अनेकदा भेटायचो. मी, जय आणि सिद्धार्थ एकत्र फिरायला जायचो. त्याची आणि माझी शेवटची भेट त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी झाली होती. मी रस्त्यावर चालण्याचा व्यायाम करत होते आणि सिद्धार्थ काही सामान विकत घेण्यासाठी आला होता. तेव्हा तो मला भेटला. तेव्हा त्याने मला चिडवलं होतं कि, जाडे तू कितीही चाललीस तरीही बारीक होणार नाहीस. त्यावर आम्ही हसलो होतो. दुसऱ्या दिवशी मी जिमवरून परत आले आणि टीव्हीवर मी त्याच्या मृत्यूची बातमी पहिली. मला खूप मोठा धक्का बसला. "

२०२१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं अचानक निधन झालं. त्याच्या अचानक मृत्यूमुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. मृत्यूपूर्वी त्याने ब्रोकन बट ब्युटीफुल सीजन ३ या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. त्याची ही वेबसिरीज खूप गाजली पण नंतर तिचा पुढचा सीजन येऊ शकला नाही. सिद्धार्थ आणि शहनाज गिल लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या पण त्याबाबत कोणतीही पुष्टी त्याच्या मृत्यूनंतर मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT