kiran mane sakal
Premier

Kiran Mane: “मी जे ठरवतो ते घडतं...”, छोट्या पडद्यावर किरण मानेंची दमदार एंट्री, झळकणार 'या' मालिकेत

Kiran Mane New Serial: किरण माने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Payal Naik

विविध मालिका, रिएलिटी शो आणि सोशल मिडीयावरील वक्यव्यांसाठी चर्चेत असलेले किरण माने पुन्हा एकदा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेत. सोशल मिडीयावर सडतोड वक्तव्यासाठी देखील किरण माने चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या पोस्टसाठी नाही तर कामासाठी किरण मानेंविषयी बोललं जातय.

किरण मानेंविषयीची चर्चा त्यांच्या नव्या मालिकेविषयी आहे. सन मराठी वाहिनीवर येणारी आगामी मालिका ‘तिकळी’ मध्ये किरण माने महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या मालिकेचे प्रोमो देखील प्रदर्शित झाले आहेत. शिवाय किरण माने यांच्या भूमिकेचा नवा प्रोमो देखील प्रदर्शित झालाय. या प्रोमोतील किरण माने यांचा अंदाज लक्षवेधी ठरतोय. या मालिकेत किरण माने नकारात्मक भूमिकेत झळकणार आहेत.

या मालिकेत ते बाबाराव खोत ही भूमिका साकारणार आहे. या प्रोमोमध्ये म्हटल्याप्रमाणे "जेवढा जमिनीवर दिसतो त्याच्या दहा पट खाली जमिनीत असलेला हा... बाबाराव खोत." असा या भूमिकेचा उल्लेख करण्यात आलाय.या प्रोमोमध्ये किरण माने बाबाराव खोतच्या भूमिकेत म्हणतात की, “मी जे ठरवतो ते घडतं, मी ते घडवतो”. बाबाराव खोत हा अंधश्रद्धाळू देखील दाखवलाय. मात्र ‘तिकळी’ ही मालिका अंधश्रद्धेच्या विरोधातली असल्याचं म्हटलय. यात किरण माने यांचा क्रूर अंदाज पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच किरण माने अशा क्रूर, नकारात्मक भूमिकेत झळकणार आहेत. १ जुलै पासून ही मालिका सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील किरण माने यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठऱली होती. विलास पाटीलच्या वडिलांच्या भूमिकेत किरण माने यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र त्या मालिकेच्या वाहिनीसोबतच्या वादानंतर किरण माने विविध चित्रपट, मालिकांमध्ये झळकले होते. बिग बॉस मराठी सिझन ४ मध्येही किरण माने झळकले होते. या कार्यक्रमातून किरण मानेंना आणखी लोकप्रियता मिळाली. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधूताई माझी माई’ या मालिकेतही किरण माने यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिंधूताईंच्या वडिलांच्या भूमिकेत ते झळकले होते. याचवर्षी किरण माने यांनी राजकारणातील वाटचाल देखील सुरु केली. उद्धव ठाकरे शिवसेना गटात त्यांनी प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Sangli Crime:' िसमकार्ड हॅक करून पोलिसदादांनाही हॅकर्सकडून गंडा'; धक्कादायक प्रकार उघडकीस

Sangli News: ‘आधी मोबदला द्या; मगच वावरात पाय ठेवा’; विटा-बस्तवडे मार्गावर शेकापतर्फे मोर्चा

SCROLL FOR NEXT