Sobhita Dhulipala express at interview on dating love Sakal
Premier

Sobhita Dhulipala : शोभिताने डेटिंगबद्दल केला मोठा खुलासा!

नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

दाक्षिणात्‍य चित्रपटसृष्‍टीतील स्टार नागा चैतन्य आपल्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे दोघे २०२१ मध्ये विभक्त झाले होते. त्‍यानंतर नागाचे नाव सातत्याने दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे.

नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच आता शोभिताने डेटिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. शोभिताने नुकतेच मुलाखतीमध्ये याबाबत भाष्‍य केले आहे. तिचे कुणावर प्रेम आहे? असे तिला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले. या प्रश्‍नावर उत्तर देताना ती म्‍हणाली, ‘‘मी नेहमीच प्रेमात असते.

प्रेम हे माणसांसाठी इंधनासारखे काम करते. मला वाटते की प्रेम ही गोष्ट आवश्यक आणि अमूल्य आहे.’’ पुढे ती म्हणाली, ‘‘माझ्याकडे पाहून अनेकांना असे वाटतं की, मी खूप खंबीर आणि कठोर आहे. मी आजवर साकारलेल्‍या भूमिकांप्रमाणे अनेकांच्या मनात माझ्याबद्दल तशी प्रतिमा तयार झाली आहे; पण मी पूर्णपणे त्याविरोधात आहे. माझा स्वभाव शांत आणि थोडा खोडकर आहे. माझ्यासाठी प्रेम ही जगातील सर्वांत शुद्ध गोष्ट आहे,’’ असे ती म्‍हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT