Singer Abdu Rozik Getting married soon 
Premier

Abdu Rozik : 'या' तारखेला बिग बॉस फेम अब्दु अडकणार लग्नबंधनात ; होणाऱ्या पत्नीविषयी म्हणाला..

Singer Abdu Rozik Getting married soon : सोशल मीडिया इन्फ्लुएसर आणि गायक अब्दु रोझीक लवकरच लग्नबंधनात अडकतोय. जाणून घेऊया त्याच्या लग्नाचे डिटेल्स.

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस हिंदी सीजन 16' मधून अब्दु रोझीक घराघरात पोहोचला. मूळच्या तजाकीस्तानच्या असलेल्या या क्युट स्पर्धकाने अल्पावधीतच सगळ्यांची मनं जिंकली. अवघ्या 20 व्या वर्षी अब्दुने जगभरात ओळख मिळवली. त्याची गायकी आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.

नुकत्याच एका मीडिया रिपोर्टनुसार अब्दु लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 7 जूनला अब्दुचं लग्न होणार असल्याची चर्चा आहे.

ई टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार, अब्दु 7 तारखेला लग्नबंधनात अडकणार असून त्याचं लग्न थाटात पार पडणार आहे. त्याची होणारी बायको शारजामधील राहणारी असून तिचं नाव अमिरा असं आहे.

याबाबत अब्दुने अजून स्वतःहून कोणतीही अधिक माहिती दिली नसली तरीही त्याचे फॅन्स त्याच्या लग्नाविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक आहेत.

ई- टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अब्दु म्हणाला की, " प्रेमाशिवाय मौल्यवान काहीच नसतं अस मला वाटतं. मी माझ्या आयुष्याच्या या नव्या प्रवासाला सुरू करण्यास उत्सुक आहे. माझ्यासाठी माझं दैनंदिन जीवन जगणं खूप कठीण आहे. आणि त्यात स्वतःसाठी प्रेम शोधणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं पण देवाच्या कृपेने मला आमिरा मिळाली आणि मी जसा आहे तसाच तिला पसंत आहे. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे."

7 जूनला अब्दु कुठे लग्न करणार ? या लग्नाला त्याचा मंडळी ग्रुप उपस्थित राहणार का? याबाबत कोणतीही बातमी समोर आली नाहीये. याशिवाय लग्नाविषयीचे अधिकचे डिटेल्स अब्दुने अजून मिडियासोबत शेअर केले नाहीयेत.

अब्दुने भारतात त्याचा बर्गरचा बिझनेस सुरू केला असून सोशल मिडियावर अजूनही त्याची क्रेझ पाहायला मिळतेय. शिवाय अब्दु काही नवीन प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. तर 2023 या वर्षात अब्दुने अनेक प्रोजेक्टसमध्ये काम केलं होतं. 'बिग बॉस ओटीटी सीजन 2' मध्ये तो सहभागी झाला होता. तर झी टीव्हीवरील 'प्यार का दुसरा नाम राधा मोहन' या मालिकेतही त्याने काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT