Sonakshi Sinha and Zaheer Iqbal sakal
Premier

Sonakshi Sinha Wedding: निकाह की सातफेरे? कसं पार पडणार सोनाक्षी अन् झहीरचं लग्न? अभिनेत्रीचे होणारे सासरे म्हणाले...

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal: सोनाक्षीचे होणारे सासरे इक्बाल रतनसी यांनी सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नबाबत नुकत्याच एका मुलाखतीत माहिती दिली आहे.

priyanka kulkarni

Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हे लवकरच लग्न करणार आहेत. सोनाक्षीच्या लग्नाशी संबंधित अनेक अपडेट्स सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांना मिळत आहेत. अशातच सोनाक्षीचे होणारे सासरे इक्बाल रतनसी यांनी सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नबाबत नुकत्याच एका मुलाखतीत माहिती दिली आहे.

ना निकाह ना सातफेरे, झहीर आणि सोनाक्षी असं करणार लग्न

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी एकमेकांना गेली काही वर्ष डेट केल्यानंतर आता लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच सोनाक्षीचे होणारे सासरे इक्बाल रतनसी यांनी या दोघांच्या लग्नसोहळ्याबद्दल सांगितलं आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, इक्बाल रतनसी यांनी सांगितलं आहे की, सोनाक्षी आणि झहीर ना हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत, ना मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न करणारेत. तर ते दोघे सिव्हिल मॅरेज म्हणजेच ​​कोर्ट मॅरेज करणार आहेत.

सोनाक्षी आणि झहीर 'या' दिवशी करणार लग्न

रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि झहीर हे दोघे 23 जून रोजी मुंबईत लग्न करणार आहेत. सोनाक्षी आणि झहीर यांनी 2022 मध्ये रिलीज झालेल्या डबल एक्सएल चित्रपटात काम केले होते. दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अभिनेत्री मनीषा कोइरालानं नुकतेच सोनाक्षीसाठी एक खास गिफ्ट पाठवले आहे. या गिफ्टसोबत मनीषानं पुष्पगुच्छ देखील पाठवले आहे. मनीषानं सोनाक्षीला दिलेल्या या गिफ्टचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT