Sonakshi Sinha Zaheer Iqbal  Sakal
Premier

Sonakshi & Zaheer Wedding : सोनाक्षी-झहीर झाले पती-पत्नी! मुंबईत पार पडलं लग्न; पाहा Photo

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Marriage: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे रविवारी अधिकृतरित्या लग्नबंधनात अडकले आहेत.

Pranali Kodre

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Marriage: बहुचर्चित बॉलिवूड कपल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे अखेर अधिकृतरित्या लग्नबंधनात अडकले आहेत. रविवारी (23 जून) सोनाक्षी आणि झहीर यांनी स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत त्यांनी लग्न केले. सोनाक्षीच्या घरी त्यांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली.

सोनाक्षी आणि झहीर हे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. तसेच ते लग्न करणार असल्याने अनेक चर्चाही होत होत्या. काहीदिवसांपूर्वीच लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. अखेर आता रविवारी त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नसमारंभात दोन्ही कुटुंबायांसह मित्रपरिवार उपस्थित होता.

लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीरने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. लग्नावेळीचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी माहिती दिली की सातवर्षांपूर्वी 23 जून रोजीच त्यांच्यातील रिलेशनशिपला सुरुवात झाली होती.

कॅप्शनमध्ये लिहिले की 'याचदिवशी 7 वर्षांपूर्वी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले आणि ते जपण्याचे ठरवले. आज त्याच प्रमाने आम्ही सर्व आव्हानं आणि अडथळ्यांना पार करत या क्षणापर्यंत पोहचलोय. दोन्ही कुटुंबाच्या आणि दोघांच्याही ईश्वराच्या आशीर्वादाने आम्ही पती-पत्नी झालो आहोत. आता शेवटपर्यंत प्रेम, आशा आणि सर्व सुंदर गोष्टी एकत्र शेवटपर्यंत जगायच्या आहेत.'

दरम्यान, आता या दोघांच्याही लग्नाचे रिसेप्शन लवकरच मुंबईतच पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी अनेक सेलिब्रेटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सोनाक्षी आणि झहीर यांनी 'डबल एक्सएल' या चित्रपटात एकत्र कामही केले आहे. तसेच सोनाक्षी तिच्या दबंग, लुटेरा अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. झहीरने 'नोटबूक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT