Sonakshi Sinha wedding card sakal
Premier

Sonakshi Sinha Wedding Card: अफवा नाही खरं! मॅगझीन थीम, रोमँटिक फोटो, सोनाक्षी- जहीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

Sonakshi Sinha- zaheer iqbal Wedding Card: लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची पत्रिका आता व्हायरल होतेय.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Sinha Wedding Card: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. सोनाक्षी आणि जहीर लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय. मात्र या अफवा आहेत की सत्य याबद्दल सगळ्यांनाच शंका होती. आता अखेर त्यांच्या लग्नाबद्दलचं खरं चित्र स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. सोनाक्षी आणि जहीर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका आता समोर आली आहे. ही पात्रिका अत्यंत हटके असून त्यात त्यांच्या लग्नातल्या ड्रेसकोडपासून वेळेपर्यंत सगळी माहिती दिली आहे.

सोनाक्षी आणि जहीर यांचं लग्न २३ जून रोजी असून त्यांची लग्नपत्रिका आता व्हायरल झाली आहे. ही पत्रिका अगदी हटके पद्धतीने बनवण्यात आली आहे. मॅगझीन कव्हरच्या रूपात ही पत्रिका बनवण्यात आली आहे. ज्यावर सोनाक्षी आणि जहीर यांचा एक रोमँटिक फोटो आहे. या फोटोमध्ये ते किस करताना दिसत आहेत. हा फोटो त्यांच्या सुट्टयांदरम्यानचा आहे. या पत्रिकेवर लिहिलंय, 'आम्ही हे ऑफिशिअल करतोय. सगळ्या अफवा खऱ्या आहेत. तो क्षण जेव्हा आम्ही कथित गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आता ऑफिशिअल पती-पत्नी बनणार आहोत. हा सोहळा तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाहीये.'

त्यांच्या पत्रिकेवर एक व्हॉइस नोट आहे. तर बॅकग्राऊंडला आफरीन हे गाणं ऐकू येत आहे. कार्डमध्ये सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम ८ वाजता सुरू होईल. तर ड्रेसकोड फॉर्मल कपडे असतील. यासोबतच लग्नात लाल रंग घालून येण्यास मनाई आहे. त्यांची ही पत्रिका आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. यासोबतच त्यानी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shops Rules: सोसायटीच्या संमतीशिवाय दारू विक्रीचं दुकान उघडता येणार नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा आदेश काय?

५,२२० एसटी गाड्यांंसह ४२ रेल्वे फेऱ्यांचे नियोजन, गौरी-गणपतीसाठी प्रशासनाचा निर्णय; विशेष सवलतींचीही घोषणा

IND vs SL Test: आता न्याय मिळणार... साई सुदर्शनच्या माघारीमुळे 'त्या' फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री होणार? त्याच्या पोस्टने उडवलेली खळबळ

IND vs SL Test : आधी जसप्रीत बुमराह, आता...! भारताच्या तगड्या फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार; मागील दोन सामन्यांत ठोकलेय शतकं...

सासूबाईंमुळेच मी माझ्या मुलीला डे केअरमध्ये ठेवत नाही... मृणाल दुसानिसने स्पष्टच सांगितलं; म्हणते- त्या नुरवीला

SCROLL FOR NEXT