Sonakshi Sinha Esakal
Premier

Sonakshi Sinha & Luv Sinha : "होय मी लग्नात नव्हतो.." सोनाक्षीच्या लग्नातील हजेरीबाबत लवने केला खुलासा ; म्हणाला...

Luv Sinha confirms reason behind not attending wedding of Sonakshi : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या भाऊ लवने तिच्या लग्नाला गैरहजेरी लावण्याबाबत खुलासा केला.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चर्चा सगळीकडे झाली. झहीर इकबालशी तिने २३ जूनला लग्नगाठ बांधली. संपूर्ण सिन्हा कुटूंब या लग्नाला उपस्थित होते पण सोनाक्षीचा मोठा लवने मात्र लग्नाला हजर राहणं टाळल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या वृत्ताला आता लवने स्वतःच दुजोरा दिला असून त्यामागचं कारण त्याने शेअर केलं.

गैरहजेरीबाबत लवने केला खुलासा

सोशल मीडियावर पोस्ट लिहून लवने लग्नाला हजेरी न लावण्याबाबत खुलासा केला. तो म्हणाला कि,"मी या लग्नाला का हजेरी लावली नाही याची कारणं अगदीच स्पष्ट आहेत आणि मला काहीही झालं तरीही काही लोकांबरोबर माझं नाव जोडलं जाणं अजिबात आवडणार नाही. मी आनंदी आहे कि पीआरने पाठवलेल्या भाकडकथांवर विश्वास न ठेवता माध्यमांनी स्वतः याबाबत थोडं संशोधन करणं पसंत केलं. पण काहीही असलं तरीही माझ्यासाठी माझं कुटूंब आधी येतं. " असं लवने म्हंटल आहे. याबरोबरच त्याच्या विरुद्ध लिहिलेल्या लेखामधील एक लिंकन त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

टेलिग्राफ इंडियाने लिहिलेल्या या लेखामध्ये झहीरबरोबर लग्न करण्याच्या सोनाक्षीच्या निर्णयामुळे सिन्हा कुटूंब अस्वस्थ होतं पण तरीही ते तिच्या आनंदासाठी या लग्नात सहभागी झाले असं लिहिलं आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नात घरातील सगळे सदस्य मर्जीविरुद्ध सहभागी झाले होते असंही या लेखामध्ये मांडलं आहे. तर सोनाक्षीचा भाऊ कुशने फक्त काही वेळासाठीच या लग्नात हजेरी लावली होती असा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाबद्दल लिहिण्यात आलेल्या या लेखात नक्की किती सत्य आहे याचा मात्र आपण अंदाजच लावू शकतो. दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती आता सुधारली असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. लवने स्वतः याबाबतची माहिती हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शेअर केली होती. शत्रुघ्न यांना व्हायरल ताप आणि अशक्तपणा आल्याचं म्हंटलं आत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ''...पण भाजपला विधानसभा जिंकायची होती'', मराठा आरक्षणावरुन रोहित पवारांचे गंभीर आरोप

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटील कसे बनले मुख्यमंत्र्यांचे नवे संकटमोचक? गिरीश महाजन-चंद्रकांत पाटील अपयशी, पडद्यामागची मोठी गोष्ट

बदला घ्यावा तर असा! CEO बनवलं नाही म्हणून महिलेनं असा काढला वचपा; तीच कंपनी विकत घेऊन बॉससोबत केलं धक्कादायक कृत्य, घटना व्हायरल

Latest Maharashtra News Updates : जीआर विरोधात ओबीसी समाज कोर्टात जाणार

Jalgaon Girna Dam : गिरणा धरण ९४% भरले; जळगावकरांना दिलासा, लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT