Sonalee Kulkarni SAKAL
Premier

Sonalee Kulkarni: "शरीरावर प्रेम करणं हा..."; वजनामुळे ट्रोल होणाऱ्या महिलांना सोनालीनं दिला खास संदेश

सोनालीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

priyanka kulkarni

Sonalee Kulkarni: मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करते. अशातच सोनालीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिलेल्या कॅप्शनमध्ये वजनावरुन ट्रोल होणाऱ्या महिलांसाठी खास संदेश दिला आहे.

सोनालीनं शेअर केले फोटो

सोनालीनं इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली ही ब्लू कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. सोनालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, “शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी – जाड किंवा बारीक असणं ही तुमची निवड आहे. आपल्या शरीरावर प्रेम करणं हा आपला अधिकार आहे. मत मांडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या.”

सोनालीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. सोनाली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक सध्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सोनाली धुराळा, झिम्मा आणि पांडू यांसारख्या चित्रपटातून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT