sonali kulkarni  sakal
Premier

तुम्ही खून करून पळपुट्यासारखे पळून जाता... दाभोळकरांच्या मारेकऱ्यांबद्दल सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत

Sonali Kulakrani On Naredra Dabholkar Killers: लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिची रोखठोक मतं मांडली आहेत.

Payal Naik

आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेमातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. सोनाली नेहमीच आपली मतं बिनधास्तपणे मांडताना दिसते. ती गेली अनेक वर्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेली आहे. आता दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांबद्दल आणि त्यांच्या हिंसेबद्दल तिने आपलं मत मांडलं आहे.

सोनालीने नुकतीच आरपार या चॅनेलला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'मी इतक्या धार्मिक घरातून आली आहे, माझा स्वतःचा देवावर विश्वास आहे. आणि तरीही मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत आले कारण डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा हा महत्वाचा विचार की कुठल्याही पद्धतीचं शोषण होता कामा नये. कशावर विश्वास ठेवायचा हा आपला स्वतःचा निर्णय आहे. मी अनेक वर्ष नरेंद्र काकांसोबत काम केलं. मी या कामाकडे ओढले गेले कारण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतं ना की एखाद्या माणसाला बरं नाहीये तर त्या माणसावर उपचार झालेच पाहिजेत. प्रार्थनेला कुणीच नाही म्हणू शकत नाही.'

पुढे सोनाली म्हणाली, ' मी सुद्धा रोज प्रार्थना करते. पण तरीही वैद्यकीय उपचारही करायलाच पाहिजेत. हे जर कुणीतरी सांगत असेल आपल्याला आणि त्या माणसाची भीती वाटून जर आपण त्याचा खून करणार असू. तर या हिंसेबद्दल आपण काय वाटून घ्यायचं? आपण किती महत्वाचं राष्ट्र आहोत. सौजन्यशीलता किती महत्वाचा गुण आहे आपल्या देशाचा. आपण कडाडून विरोध करू शकतो ना. आपल्याला कायद्याने परवानगी दिलीये. पण आपण विरोध नाही करत. आपण पळपुट्यासारखे खून करून पळून जाणार आहोत. हे खूप डाचतं मला.'

सोनाली पुढे म्हणाली, 'आजही मला त्या गोष्टीचा त्रास होतो की हिंसा चूकच आहे. विचारांचा विरोध हा विचारांनीच करायलाच हवा नाहीतर प्रत्येक क्रिकेट मॅचनंतर मुडदे पडले असते. नैराश्य आल्यावर आत्महत्या करणं हा पर्याय नाहीये. माझ्या सह कलाकाराला चांगला शॉट देता आला नाही म्हणून मी सुचवू शकते. मी काय जाऊन गळा दाबणार आहे का त्याचा? नाही. माझ्या मनातच तो विचार येणार नाही. त्यासाठीच देवाने मेंदू दिलाय ना. विचार करायला दिलाय ना.' सोनालीची ही मुलाखत सध्या व्हायरल होतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT