Sonam Kapoor sakal
Premier

Sonam Kapoor: सोनमला वाढदिवशी पतीकडून मिळालं खास गिफ्ट; फोटो शेअर करत म्हणाली...

Anand Ahuja: सोनमनं तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

priyanka kulkarni

Sonam Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सोनमच्या वक्तव्यांची चर्चा होते तर कधी तिच्या फॅशन स्टाईलची चर्चा होते. काल (8 जून) सोनमचा 39 वा वाढदिवस होता. सोनमनं तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये सोनमला तिच्या पतीनं दिलेलं गिफ्ट दिसत आहे.

सोनमला आनंदनं दिलं खास गिफ्ट

सोनमचा पती आनंद आहूजानं (Anand Ahuja) सोनमला खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं गीतांजली हा गीतांचा संग्रह सोनमला गिफ्ट म्हणून दिला. सोनमनं आनंदच्या या गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझ्या नवऱ्याने वाढदिवसाला दिलेली भेट... टागोरांच्या गीतांजलीची इंग्रजीत अनुवादित झालेली पहिली आवृत्ती. धन्यवाद आनंद."

Sonam Kapoor

सोनमची बहीण रिया कपूरने सोनमच्या बर्थ-डे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये सोनमच्या वाढदिवसासाठी केलेले खास डेकोरेशन दिसत आहे.

Sonam Kapoor

सोनमचे चित्रपट

सोनम 7 जुलै 2023 रोजी रिलीज झालेल्या क्राईम थ्रिलर 'ब्लाइंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. शोम मखिजा आणि सुजॉय घोष यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका असतात. 2019 मध्ये सोनमचा 'द झोया फॅक्टर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता सोनमच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT