sonu nigam asha bhosale  sakal
Premier

Sonu nigam: याला म्हणतात संस्कार! सोनू निगमने सगळ्यांसमोर धुतले आशा भोसले यांचे पाय; नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव

Asha Bhosle And Sonu Nigam: गायक सोनू निगम याने पद्मश्री गायिका आशा भोसले यांचे पाय धुतले आहेत.

Payal Naik

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम याने आपल्या आवाजाने श्रोत्यांना आपलंसं केलं. चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करतात. आता त्याचा एक व्हिडिओ समोर येतोय जो पाहून नेटकरी त्याचं कौतुक करतायत. या व्हिडिओमध्ये सोनू दिग्गज गायिका आशा भोसले यांचे पाय धुताना दिसत आहे. त्यांचे पाय धुवून तो आपल्या कपाळाला लावतो. हे पाहून नेटकरी त्याच्या वागण्याचं आणि संस्कारांचं कौतुक करताना दिसतायत.

लोकप्रिय बॉलिवूड गायिका आशा भोसले यांनी नुकतंच त्यांचं आत्मचरित्र 'स्वरस्वामीनी' हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि गायक उपस्थित होते. या कार्यक्रमात सोनू यांनी आशा भोसले यांना दिलेला मान पाहून सगळेच भारावून गेले. बॉलिवूडमध्ये अशा गोष्टी कमी पाहायला मिळतात असं म्हणत नेटकऱ्यांनी सोनूचं कौतुक केलं. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो आपल्या पूज्य गुरूंची पूजा करताना दिसतो आहे.

सोनू आशा यांच्या समोर बसतो. एका भांड्यात त्यांचे पाय ठेवतो. गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या पाण्याने त्यांचे पाय धुतो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतो. त्यांच्या पायाचं चुंबन घेतो. जणू तो आपल्या मंदिरातल्या देवाची पूजा करतो आहे तशी तो आशा यांची मनापासून पूजा करताना दिसतोय. त्याचा हा भाव पाहून नेटकरी त्याच्यावर फिदा झाले आहेत. हे करताना तो म्हणाला, 'आज शिकायला खूप साधन आहेत पण जेव्हा शिकायला काहीच नव्हतं तेव्हा लताजी आणि आशाजी होत्या.'

काही नेटकरी मात्र त्याच्या या वागण्याला खोटं ठरवत आहेत. तो हे सगळं फक्त दिखाव्यासाठी करत आहे असं म्हणत आहेत. मात्र अनेकांना त्याचं हे वागणं आवडलं आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT