Rangpanchami Mahasangam Sakal
Premier

Rangpanchami Mahasangam : सोनी मराठीवर रंगपंचमीचा ‘महासंगम’

होळी या सणानिमित्त सोनी मराठी वाहिनीने ‘रंगपंचमी महासंगम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महासंगम म्हणजेच सोनी मराठीवरील सगळ्याच मालिकांतील प्रेक्षकांना आवडणाऱ्या व्यक्तिरेखा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Rangpanchami Mahasangam : होळी या सणानिमित्त सोनी मराठी वाहिनीने ‘रंगपंचमी महासंगम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महासंगम म्हणजेच सोनी मराठीवरील सगळ्याच मालिकांतील प्रेक्षकांना आवडणाऱ्या व्यक्तिरेखा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत.

हे सगळे कलाकार रंगमंचमी खेळताना दिसणार आहेत. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील सराफ परिवाराने सगळ्या व्यक्तिरेखांना आपल्या घरी होळी पार्टीनिमित्त एकत्र बोलावले आहे. यामिनी सराफ यांनी या सोहळ्याचे आयोजन केले असून राजवीर आणि मयुरी हे या सगळ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणार आहेत.

या पार्टीमध्ये वीरू आणि प्राजक्ता, मीरा आणि मल्हार, बयो आणि डॉ. विशाल, यशोधन आणि असीम हे सगळे कलाकार एकत्र दिसणार आहेत. या रंगपंचमी पार्टीमधील प्रमुख बाब म्हणजे या कलाकारांचे पेहराव. सगळ्या जोड्या वेगवेगळ्या रंगांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. रंगपंचमी म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर निरनिराळे रंग दिसतात.

तशाच विविध रंगांमध्ये हे कलाकार पाहायला मिळतील. शिवाय या ‘महासंगम’मध्ये या प्रत्येक कलाकाराचे विशेष असे नृत्य सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होळी विशेष आणि प्रेक्षकांना आवडणाऱ्या निरनिराळ्या गाण्यांवर हे कलाकार थिरकताना दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : धीरेंद्र शास्त्रींच्या आव्हानावर श्याम मानव यांची प्रतिक्रिया

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या कारचे आमदार देवेंद्रांनी केले सारथ्य; मुख्यमंत्र्यांशी झालेली जवळीक ठरली चर्चेची!

SCROLL FOR NEXT