priyanka mohan  esakal
Premier

अभिनेत्री बोलत असतानाच चालू कार्यक्रमात धाडकन खाली पडला स्टेज; थरारक व्हिडिओ पाहून नेटकरी चिंतेत

Actress Collapse From Stage: लोकप्रिय अभिनेत्री स्टेजवर असतानाच अचानक जास्त वजनाने स्टेज धाडकन खाली पडला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Payal Naik

तेलंगणामध्ये एका कार्यक्रमात एक मोठी घटना घडली आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियंका मोहन एका मोठ्या अपघातातून बचावली आहे. या अपघातात तिला किरकोळ मार लागला आहे. ३ ऑक्टोबर रोजी प्रियंका तेलंगणामध्ये एका कार्यक्रमात पोहोचली होती. एका शॉपिंग मॉलच्या उद्धघाटनासाठी अभिनेत्रीसोबत काँग्रेस नेत्या झाँसी रेड्डीदेखील उपस्थित होत्या. मात्र या कार्यक्रमात स्टेजवर गर्दी झाल्याने अचानक संपूर्ण स्टेजचं खाली कोसळला. या घटनेत अभिनेत्रीला किरकोळ मार लागला मात्र झाँसी रेड्डीसोबत तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या घटनेनंतर प्रियंका मोहनने वर एक ट्वीट करत चाहत्यांचे आभार मानले. तिने लिहिले, 'मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की मी ठीक आहे. मी भाग्यवान आहे की मला फक्त किरकोळ दुखापत झाली आणि मी बचावले. तिने पुढे लिहिले की, 'या घटनेत जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. त्याला माझ्या शुभेच्छा. ज्यांनी मला प्रेमळ आणि काळजी घेणारे संदेश पाठवले त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते.

अपघाताचा व्हिडिओ समोर आला, धक्क्याने स्टेज कोसळला

तिरूरमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवर अनेक लोक उभे असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही सेकंदातच स्टेज कोसळून खाली पडतो आणि आवाज येतो. प्रियांकाला किरकोळ दुखापत झाली असून, तिला तातडीने घटनास्थळावरून हलवण्यात आले.

प्रियांका मोहनच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच जयम रवी स्टारर 'ब्रदर' या चित्रपटात दिसणार आहे, जो 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. जयम रवीसोबतच्या तिच्या लग्नाचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहत्यांना वाटलं की तिने लग्न केलं आहे. मात्र हा व्हायरल झालेला फोटो 'ब्रदर'च्या शूटचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT