varlaxmi wedding  sakal
Premier

कुठलाही गाजावाजा नाही, ना पाहुण्यांची गर्दी, लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, फोटो होतायत व्हायरल

Varalaxmi sarathkumar Wedding : एकीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा आहे. दुसरीकडे एका लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Varalaxmi Sarathkumar Marriage Photo: सध्या सोशल मीडियावर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची चर्चा आहे. गेला आठवडाभर त्यांच्या लग्नाच्या अनेक विधी पार पडल्या. आज १२ जुलै रोजी अनंत राधिका मर्चन्टसोबत विवाहबद्ध होणार आहे. अत्यंत थाटामाटात हा विवाह पार पडणार आहे. नववधू आणि वराला पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत. मात्र अशातच राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या धामधुमीत एका लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. तिने अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबतही शेअर केले आहेत. ही अभिनेत्री आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी वरलक्ष्मी सरथकुमार. तिने व्यावसायिक निकोलाई सचदेव याच्यासोबत विवाह केला आहे. ते दोघे दाक्षिणात्य पद्धतीने लग्नबंधनात अडकले आहेत. थायलंडमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नासाठी त्यांनी पारंपरिक वेश केला होता. सजावटही पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती. वरलक्ष्मी आणि निकोलाई यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

त्यांच्या लग्नातील खास फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'मी माझ्या स्वप्नातील परिकथेप्रमाणे लग्न केलं आहे. माझ्या राजकुमाराने मला लग्नासाठी मागणी घातली आणि मी ती मान्य केली. एक दिवस गेला आणि असे कित्येक दिवस जायचे आहेत. खाण्याचे, प्रेमाचे आणि खूप साऱ्या आनंदाचे. माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे.' चाहते आता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वरलक्ष्मीने तिच्या लग्नाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिलं होतं. तिने तिचा एक व्हिडिओ आणि फ़ोटोही शेअर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT