Vijay Deverakonda, Rana Daggubati, Prakash Raj get ED Notice : दक्षिणेतील अनेक बड्या स्टार्सवर आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आपली पकड घट्ट करण्यास सज्ज आहे. सोमवारी ईडीने विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज आणि लक्ष्मी मंचू यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींना समन्स पाठवून ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात या कलाकारांना समन्स पाठवले आहेत. ईडीने या कलाकारांना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. आरोपांमध्ये असा दावा केला आहे की या दक्षिणेतील फिल्म स्टार्सनी ऑनलाइन पॉप-अप जाहिरातींद्वारे या बेटिंग प्लॅटफॉर्म्सचा प्रचार केला, लोकांना बेकायदेशीर बेटिंग खेळण्यास प्रोत्साहित केले.
बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा, प्रकाश राज आणि लक्ष्मी मंचू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अंमलबजावनी संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर अशा अॅप्सचा प्रचार केला होता ज्यांना देशात बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे.
सक्तवसुली संचालनालयाने राणा दग्गुबाती यांना २३ जुलै, प्रकाश राज यांना ३० जुलै, विजय देवरकोंडा यांना ६ ऑगस्ट आणि लक्ष्मी मंचू यांना १३ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की या अॅप्सद्वारे हजारो कोटींचे व्यवहार झाले आहेत आणि या स्टार्सना या जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यात आली होती. सध्या सर्वांना समन्स पाठवण्यात आले आहेत आणि ईडी चौकशीची तयारी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.