Allu Arjun esakal
Premier

Allu Arjun : ‘मादाम तुसॉ’मध्ये अल्लू अर्जुनचा पुतळा

नुकतेच त्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले.

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा २ : द रुल’साठी चर्चेत आहे. त्याला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाली. आता अल्लू अर्जुनचा दुबईतील मादाम तुसॉ या संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. नुकतेच त्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले.

सोबतच त्याने आपल्या पुतळ्यासह ‘पुष्पा’ची आयकॉनिक पोज देत फोटो काढले. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते आता प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रेटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या फोटोमधील खरा अल्लू अर्जुन कोणता? हे नेटकऱ्यांना ओळखणे कठीण झाले आहे.

मादाम तुसॉ म्युझियमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वत:चा मेणाचा पुतळा पाहून अल्लू अर्जुनला आनंद झाला, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘द बिग रिव्हिल, अल्लू अर्जुनने दुबईतील त्याचा मेणाचा पुतळा पाहिला,’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT