Amitabh Bachchan  Sakal
Premier

Amitabh Bachchan : दहा दिवस चित्रीकरण करुन अमिताभ यांनी सोडला होता चित्रपट

अभिनेते अमिताभ बच्चन हे चित्रपट जगतातील सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांचे खरे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते; पण अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक घटना तुम्‍हाला आश्चर्यचकित करेल.

सकाळ वृत्तसेवा

अभिनेते अमिताभ बच्चन हे चित्रपट जगतातील सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांचे खरे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते; पण अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक घटना तुम्‍हाला आश्चर्यचकित करेल.

जेव्हा अमिताभ बच्चन ‘शोले’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्‍त होते, त्‍याचदरम्‍यान ते दुसऱ्या एका चित्रपटाचे चित्रीकरणदेखील करत होते. त्‍या दुसऱ्या चित्रपटाच्या दहा दिवसांच्या चित्रीकरणानंतर दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटातून काढून टाकले होते. त्‍या चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी होते. त्यांनी आधी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना कास्ट केले होते; पण नंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या जागी त्या काळातील दुसरे मोठे अभिनेते धर्मेंद्र यांना या चित्रपटात घेतले.

अशाप्रकारे पहिल्यांदाच धर्मेंद्र आणि जया बच्चन पडद्यावर एकत्र दिसले. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गुड्डी’ हा तो चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची खास भूमिका होती. त्यावेळी ऋषिकेश मुखर्जी दोन चित्रपट बनवत होते.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा ‘आनंद’ आणि दुसरा जया बच्चन, सुमित सन्याल आणि अमिताभ यांच्यासोबतचा ‘गुड्डी’ हे ते चित्रपट होते. त्यांचे दोन्ही चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करू नयेत, असे दिग्दर्शकांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याऐवजी धर्मेंद्र यांना चित्रपटात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: 'मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भान ठेवून बोलावे'; सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, मुख्यमंत्र्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु नये

Tribal Teachers Protest : कंत्राटी शिक्षक नको! नाशिकमध्ये आदिवासी बिऱ्हाड आंदोलनकर्त्यांचा संयुक्त ग्रामसभेचा एल्गार

India Fitness Test Results: शुभमन गिल, जसप्रीत बुमराह यांनी पास केली फिटनेस टेस्ट; रोहित शर्मा...

Education News : घरबसल्या शिक्षण पूर्ण करा; मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान तीन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, ५०० जणांचा मृत्यू, 1000 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT