Stree 2 Esakal
Premier

Stree 2 Ending Explained: सरकटाचा खरंच अंत झाला का ? अक्षय कुमार साकारणार स्त्री 3 मधील व्हिलन ? जाणून घ्या शेवटच्या सीनचा अर्थ

Stree 2 Climax scene and other hints explained: स्त्री 2 सिनेमा सगळीकडे गाजतोय पण अजूनही बऱ्याच जणांना सिनेमाच्या शेवटाचं कोडं उलगडलं नाहीये. काय आहे त्याचा अर्थ जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bollyood Entertainment News : श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेल्या स्त्री 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कॉमेडी हॉरर प्रकारातील या सिनेमाने प्रेक्षकांना हसवता हसवता थोडस घाबरवलं देखील. सरप्राईज, थ्रिल याने पुरेपूर असलेला हा सिनेमा अनेकजण एन्जॉय करत आहेत. या सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये स्त्री च्या तिसऱ्या भागाचीही हिंट देण्यात आली आहे. पण जर तुम्हाला सिनेमाच्या पोस्ट क्रेडिट सीनमधील हिंट कळली नसेल तर हा लेख जरूर वाचा.

असा झालाय स्त्री 2 सिनेमाचा शेवट

स्त्री 2 च्या शेवटच्या सीनमध्ये पाहायला मिळालं कि बिकी आणि अनोळखी स्त्री सरकटाला मारण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हाच भेडिया (वरुण धवन) त्यांच्या मदतीला येतो. या काळात खरी स्त्रीही अवतरते. तेव्हा प्रेक्षकांना कळतं कि, खरी स्त्री ही श्रद्धा कपूरने साकारलेल्या भूमिकेची आई आहे. त्यानंतर विकी त्यांच्याकडची तलवार स्त्रीला देण्याचा प्रयत्न करतो आणि काही प्रयत्नानंतर स्त्री सरकटाला मारून टाकते.

त्यानंतर सरकटा पळवलेल्या सगळ्या स्त्रिया मुक्त झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

अक्षय दिसणार स्त्री 3 मध्ये ?

सरकटाला मारून टाकल्यानंतर सिनेमात पोस्ट क्रेडिट सीनमध्ये दिसतं कि, स्त्री त्याला लाव्हामध्ये टाकते. तेव्हाच आपल्याला अक्षय कुमारही तिथे आलेला दिसतो. सिनेमाच्या सुरुवातीला अक्षय लाव्हा पिताना दाखवलाय त्यामुळे अक्षयचं रूपांतर राक्षसात होणार का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तिसऱ्या पार्टमध्ये अक्षय व्हिलन साकारणारअसल्याची हिंट मेकर्सनी दिल्याची चर्चा आहे. तर काही ठिकाणी अक्षय सरकटाचा वारस असल्याचं म्हंटल जातंय.

शेवट इंटरेस्टिंग असला तरीही सिनेमाच्या शेवटी मिळालेल्या या हिंट्समुळे प्रेक्षक आता तिसरा भाग बघण्यासाठी अधिक उत्सुक आहेत. स्त्री 2 ने आतापर्यंत 100 करोडहुन अधिक कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT