Sangit Manapamna Esakal
Premier

Sangeet Manapaman Teaser Out: सुरु होणार धैर्यधर आणि भामिनीची सुरेल प्रेमकथा ; संगीत मानापमानच्या टीझरची होतेय चर्चा, भामिनीची भूमिका चर्चेत !

Subodh Bhave's Sangit Manapaman Teaser Out : सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मानापमान या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. या टीझरची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Latest Movie : 'कट्यार काळजात घुसली' या गाजलेल्या सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा एका भव्य सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कट्यार नंतर सुबोध संगीत मानापमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. संगीत मानापमान या गाजलेल्या संगीत नाटकावर आधारित हा सिनेमा असून या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला.

संगीत मानापमान सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. लढाऊ वृत्तीचा आणि राजाच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी उत्सुक असलेल्या धैर्यधर या तरुणाची भूमिका सुबोध या सिनेमात साकारतोय. या भूमिकेची झलक या टीझर मध्ये पाहायला मिळाली. दाढी, धोतर आणि पगडी या पोशाखातील सुबोधचा लूक खूप वेगळा दिसत आहे. तर तो भामिनी नावाच्या तरुणीचा शोध घेत असल्याचंही पाहायला मिळालं. तर वनमाला नावाची स्त्रीही त्याच्या आयुष्यात असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळालं. आता या भामिनी आणि वनमाला एकच आहेत का हे हा सिनेमात रिलीज झाल्यावर समजेल.

सोशल मीडियावर सिनेमाचा टीझर शेअर करत सुबोधने त्याला,स्वर, सौंदर्य आणि शौर्याचा अद्भुत मिलाफ!
सादर आहे कै.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवरून प्रेरीत 'संगीत मानापमान' ह्या संगीतमय चित्रपटाची झलक..
येत्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर अनुभवूया मराठी परंपरेचा साज आणि सुरेल गीतांचा आवाज.' असं कॅप्शन दिलं आहे. अनेकांनी या टीझर कमेंट करत त्याचं या सिनेमासाठी अभिनंदन केलं आणि टीझरचं कौतुक केलं.

या सिनेमात भामिनीच्या भूमिकेत कोण दिसणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. पण टीझरवरील एका स्त्रीच्या आवाजावरून अभिनेत्री नीना कुलकर्णी या सिनेमात काम करणार आहेत असा अंदाज आहे. हा बहुप्रतीक्षित सिनेमा १ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. जिओ सिनेमाने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

कै.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या गाजलेल्या संगीत मानापमान या संगीत नाटकावर आधारित या सिनेमाची कथा असून एकेकाळी बालगंधर्वांनी या सिनेमात भामिनीची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT