Sukh Mhanje Nakki Kay Asta esakal
Premier

Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मोठा ट्विस्ट; माईंना जिवंत पाहून शालिनी घाबरली

Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. माई जिवंत असल्याचं सत्य शालिनीसमोर येणार असून शालिनीच्या अंताला सुरुवात होणार आहे.

priyanka kulkarni

Sukh Mhanje Nakki Kay Asta: स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही चर्चेत राहणारी मालिका. मालिकेत आता गौरी आणि जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवली जात असून यातील ट्विस्ट अँड टर्न्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. माई जिवंत असल्याचं सत्य शालिनीसमोर येणार असून शालिनीच्या अंताला सुरुवात होणार आहे.

नुकतंच सोशल मीडियावर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं कि, शालिनी तिच्या नवीन बिझनेसची घोषणा गावकऱ्यांसमोर करते. ती सगळ्यांना ती नंदिनी गृहउद्योग हा माईंच्या आठवणीत सुरु करणार असल्याचं सांगते. ती माईंच्या फोटोला हार घालायला जाते तेव्हा माई तिच्यासमोर येतात. माई जिवंत असल्याचं पाहून ती घाबरते आणि मागे जाते. तर हे सगळं पाहून नित्या आणि अधिराजला धक्का बसतो.

पहा प्रोमो:

मालिकेच्या या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत प्रोमो आवडल्याचं म्हंटलं. तर काही प्रेक्षकांनी ‘एकदाची मालिका संपवा’ अशी मागणी केली तर एका युजरने ती ‘कसलं काय ती पुन्हा मारणार’ अशी कमेंट करत शालिनीचा अंत होणार नाही असा अंदाज वर्तवला. पण आता मालिकेत नेमके काय ट्विस्ट पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागेल.

मालिकेतील कथानकात अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. जोगतिणीच्या हुशारीमुळे शालिनी तिचा शेवट ज्या गावात होणार आहे त्याच गावात येऊन पोहोचली आहे. शालिनी परत आल्याचं कळल्यावर माईंनीही तिला सामोरं जायचं ठरवून नित्या आणि अधिराजची तिच्या तावडीतून सुटका करण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत. तर नित्या आणि अधिराजसमोर त्यांच्या भूतकाळाचं रहस्य उलगडणार आहे.

मालिकेतील हा ट्विस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा महाएपिसोड रविवार २१ एप्रिल २०२४ ला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केला जाणार आहे. नित्या आणि अधिराज जयदीप गौरीचा पुनर्जन्म आहे हे सत्य शालिनीला समजणार का? शालिनी स्वतःला वाचवण्यासाठी आता काय प्लॅन करणार या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या गामी भागात मिळतील तेव्हा पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं? सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT