Premier

Viral Video : ...जेव्हा सुमित मित्राला पोहायला शिकवतो; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "पाण्यात फेकलं ह्याला पण..."

Sumeet Pusavale viral video : अभिनेता सुमित पुसावळेने सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

Sumeet Pusavale : मराठी टेलिव्हिजनविश्वातील आघाडीचा अभिनेता सुमीत पुसावळे सोशल मीडिया रील्समुळेही चर्चेत असतो. तो त्याच्या गावीही सतत जात असतो आणि तेथील गंमती तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच त्याने एक व्हिडीओ शेअर केला ज्यात तो पोहण्याची ट्रेनिंग देतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .

सुमीतची पोस्ट

सुमीतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आणि त्याचा भाऊ कुणाला तरी ओढत आणून पाण्यात ढकलताना दिसत आहेत आणि नंतर ती व्यक्ती पोहण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. सुमीतने या व्हिडीओवर "पाण्यात फेकलं ह्याला पण कंबरड आमचं मोडलं" असं कॅप्शन दिलं आहे तर 'इथे पाण्यात पोहायला शिकवलं जाईल' असं म्हणत कोण कोण शिकणार असंही विचारलंय.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

अनेकांनी कमेंट करत सुमीतच्या या व्हिडिओचं कौतुक केलं. सुमीतची बायको मोनिकाने "आम्ही एका कोपऱ्याला उभी राहिलेली पब्लिक" अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी क्रेन वापरण्याचा सल्ला दिला पण तर अनेकांनी "तुम्ही असं वागलात म्हणूनच कंबरडं मोडलं" असं म्हंटलं. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतकंच नाही सुमित त्याच्या बायकोबरोबर करत असलेले रोमँटिक व्हिडिओही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. अनेकांना ही जोडी आवडते.

सुमितची कारकीर्द

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून पदार्पण केलेल्या सुमीतला ओळख मिळाली ती कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेमुळे. या मालिकेत त्याने साकारलेली संत बाळूमामांची भूमिका खूप गाजली. पण आता काहीच महिन्यांपूर्वी त्याने ही मालिका सोडली आणि स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या मालिकेत तो हृषीकेश ही भूमिका साकारत असून रेश्मा शिंदेबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. एकत्र कुटूंब पद्धती आणि भावंडांचं नातं यावर ही नवीन मालिका आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT