sunidhi chauhan  esakal
Premier

Sunidhi Chauhan: ते सगळं खोटं... सुनिधी चौहानने सांगितलं रिऍलिटी शोचं सत्य, म्हणते- निर्मातेच आम्हाला सांगतात की

Sunidhi Chauhan On Singing Reality Shows: लोकप्रिय बॉलिवूड गायिका सुनिधी चौहान हिने आता गाण्याच्या होणाऱ्या रिऍलिटी शोबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

Payal Naik

बॉलिवूडची गाजलेली गायिका सुनिधी चौहान हिने आपल्या गोड गळ्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिच्या सुमधुर आवाजाचे लाखो चाहते आहेत. तिने आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना भुरळ पाडली. बॉलिवूडमधील टॉप गायिकांमध्ये सुनिधीचं नाव घेतलं जातं. तिचे लाखो चाहते आहेत. एका रिऍलिटी शो मधून पुढे आलेली ती अनेकदा अशाच सिंगिंग रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनिधीने आताच्या रिऍलिटीशोमागचं सत्य सांगितलं आहे. कॅमेरामागे नेमकं काय घडतं हे तिने सांगितलं आहे.

सुनिधीने नुकतीच राज शमानी याच्या पॉडकास्टला हजेरी लावली. यात तिने हे रिऍलिटी शो खोटे असल्याचं सांगितलं. सोबतच तिने परीक्षक म्हणून तिचा अनुभवही शेअर केला. पॉडकास्टमध्ये बोलताना सुनिधी म्हणाली, 'आताचे सिंगिंग रिऍलिटी शो हे खोटे आहेत. काहीही खरं नाहीये. सुरुवातीच्या दोन वर्षातले कार्यक्रम हे खरे होते जेव्हा मी इंडियन आयडॉलमध्ये जज होते. तेव्हा असं भावनिक नाटक नव्हतं. तुम्ही टीव्हीवर जे पाहत होतात ते खरं होतं. पण आता परिस्थिती बदललीये. आता सगळं एडिट केलेलं असतं. निर्माते प्रत्येक गायकाला सकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातल्या एकाला अचानक दुसऱ्या दिवशी काढून टाकतात. त्यामुळे प्रेक्षकही गोंधळतात. हा सगळं प्लॅन असतो.'

ती पुढे म्हणाली, 'निर्माते येऊन सांगतात की कोणत्या स्पर्धकाला पुढे न्यायचंय आणि कुणाला नाही. त्यांना हवं त्याचं स्पर्धकाला ते वाचवतात. या सगळ्या प्रकारांमुळे मी अशा कार्यक्रमात परीक्षक म्हणून जाणं बंद केलं. हे खूप धक्कादायक होतं की निर्माते तुम्हाला सांगतात कोणत्या स्पर्धकाला चांगलं बोलायचं आणि कुणाला नाही. मग तो चांगला गायला नाही तरी चालेल. कारण त्याच्यामुळे वाहिनीला फायदा होत असतो.' यासोबतच सुनिधीने अनेक गायक ऑटोट्यून वापरत असल्याचंदेखील सांगितलं. तर काही गायक लाइव्ह कॉन्सर्टला देखील फक्त तोंड हलवत असतात, असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : शासनाच्या तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी शिथिल

Yavtmal School incident: धक्कादायक! तिसरीतील मुलीवर शाळेतील टॉयलेटमध्ये वर्गातील मुलाकडूनच अत्याचार

AUS vs SA, Video: बॉल स्टम्पला लागून लाईट्सही लागले, तरी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज नॉटआऊट; नेमकं काय घडलं की सर्वच झाले अवाक्

'Sanju Samson राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडण्याचं प्रमुख कारण रियान पराग', माजी क्रिकेटरनं सर्व गणित स्पष्ट सांगितलं

Meat Ban Controversy : स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालणं अयोग्य...अजित पवार स्पष्टच बोलले... महापालिकांकडून निर्णय मागे घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT