the great indian kapil show sakal
Premier

The Great Indian Kapil Show: "मुलींसारखे कपडे घालून लोकांच्या मांडीवर बसणे, हे घृणास्पद!"; 'द कपिल शर्मा' शोवर भडकला कॉमेडियन

Sunil pal criticizes the great indian kapil show: नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना सुनील पाल यांनी द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो या कार्यक्रमामधील कलाकारांवर टीका केली आहे.

priyanka kulkarni

Sunil pal On The Great Indian Kapil Show: कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. कपिलचा द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) हा कार्यक्रम सध्या नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये हिरामंडी या वेब सीरिजची संपूर्ण स्टार कास्ट हजेरी लावणार आहे, अशातच आता या कार्यक्रमावर कॉमेडियन सुनील पाल  (Sunil Pal) हे भडकले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना सुनील पाल यांनी द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमामधील कलाकारांवर टीका केली आहे.

काय म्हणाले सुनील पाल?

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनील पालनं सांगितलं, "नेटफ्लिक्सवरील बाकीचा कंटेन्ट वल्गर आहे. द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये बरेच सेलिब्रिटी आले. पण शोमधील आर्टिस्ट नवीन गोष्टी करत नाहीयेत. 40 लेखक शोसाठी लिहित आहे, असं मी ऐकलंय. पण नवं काहीच शोमध्ये दिसत आहे."

पुढे त्यांनी सांगितलं, "सुनील ग्रोव्हर शोमध्ये मुलीच्या भूमिकेत काम करतो. तो मुलींसारखे कपडे घालून अश्लील गोष्टी बोलतो, लोकांच्या मांडीवर बसतो, हे घृणास्पद आहे. ते मला आवडत नाही. हे अश्लील आणि चीप दिसते. तो ज्या प्रकारे मुलींची भूमिका साकारतो, तेवढ्या मुली डेस्परेट नसतात."

कपिल शर्मा, सुनील ग्रोवर, कीकू शारदा, राजीव ठाकुर, अर्चना पूरण सिंह आणि कृष्णा अभिषेक हे कलाकार द ग्रेट इंडियन कपिल शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT