Porsche Car: पुण्यात (Pune) झालेल्या अपघाताची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक तरुण आणि तरुणीला अल्पवयीन मुलाच्या एका चुकीमुळे जीव गमवावाल लागला. एका मुलाच्या पोर्शे गाडीनं (Porsche Car) एका तरुणाला आणि तरुणीला चिरडले. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच या घटनेमुळे पोर्शे गाडी चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींकडे देखील ही गाडी आहे. पर्शे गाडी कोण-कोणत्या सेलिब्रिटींकडे आहे? याबद्दल जाणून घेऊयात...
सनी देओलने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला Porsche 911 GT3 ही गाडी खरेदी केली. Porsche 911 GT3 टूरिंगची किंमत जवळपास 3 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, सनी देओलला पोर्श ब्रँड आवडतो. त्यामुळे त्यानं Porsche 911 GT3 ही गाडी खरेदी केली.
राम कपूरने 2021 मध्ये निळ्या रंगाची पोर्श 911 गाडी खरेदी केली. राम कपूरच्या मालकीची ही पोर्श 911 या कारमध्ये 3.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज सहा-सिलेंडर बॉक्सर इंजिन आहेत, जे 444 PS पॉवर तयार करु शकतात.
अभिनेता फरहान अख्तर यांच्याकडे Porsche Cayman GTS ही गाडी आहे. या पोर्शे कारमध्ये ३.४-लिटर टर्बोचार्ज्ड इनलाइन आहे, जे सहा पेट्रोल इंजिनमधून ३४० पीएस कमाल पॉवर तयार करु शकते आणि जो ३८० एनएम पीक टॉर्क जनरेट करतो.
माधुरी दीक्षित काही दिवसांपूर्वी मुंबईत तिच्या पतीसोबत पांढऱ्या रंगाच्या पोर्श 911 मध्ये स्पॉट झाली होती.
फहद फासिल,ममता मोहनदास,दुल्कर सलमान या कलाकारांकडे देखील पोर्शे गाडी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.