Hamare Baara sakal
Premier

Hamare Baarah Controversy: प्रदर्शनावर पुन्हा रोख! उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत 'हमारे बारह' चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं...

'हमारे बराह' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

priyanka kulkarni

Supreme Court: 'हमारे बराह' (Hamare Baara) या चित्रपटाचं प्रदर्शन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (13 जून) रोखले आहे. हा चित्रपट इस्लामिक श्रद्धा आणि विवाहित मुस्लिम महिलांचा अवमान करणारा असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. या प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालय लवकरात लवकर घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आव्हान देणारी याचिका निकाली निघेपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा आदेश दिला.

"आम्ही उच्च न्यायालयाला विनंती करतो की, चित्रपटाच्या विरोधात करण्यात आलेली याचिका लवकर निकाली काढावी," असे न्यायालयाने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवताना सांगितले.

वकिलाचा दावा न्यायालयाने सर्वोच्च फेटाळला

चित्रपट निर्मात्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, "टीझरमधून सर्व आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत." पण वकिलाचा हा दावा न्यायालयाने फेटाळला. "आम्ही आज सकाळी टीझर पाहिला आणि सर्व दृश्ये आहेत," असे त्यांनी म्हटलं.

चित्रपट निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी सांगितले की, चित्रपटाचं प्रदर्शन रोखल्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागेल, तेव्हा न्यायालयाने म्हटले, "जर चित्रपटाचा टीझर इतका आक्षेपार्ह असेल तर संपूर्ण चित्रपटाचे काय? प्रथमदर्शनी असे दिसते की, तुम्ही स्वतः टीझरमधील सीन हटवण्यास अयशस्वी झाला आहात. या पार्श्वभूमीवर, चित्रपटाच्या सीबीएफसी प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर त्वरीत निर्णय घेण्यास न्यायालयाने उच्च न्यायालयाला सांगितले.

हमारे बराह अडकला वादाच्या भोवऱ्यात

गेल्या काही दिवसांपासून हमारे बराह हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटामध्ये इस्लामिक धर्माबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे. अशातच या चित्रपटाच्या विरोधात एक याचिका न्यायालयात सादर करण्यात आली. आता या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकणार नाही.

'हमारे बराह' हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात अन्नू कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले, अनेक शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक

Eknath Shinde: जालन्यात शिंदेसेनेला मोठं भगदाड! सर्व तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, कार्यपद्धीवर नाराज

IND U19 vs PAK U19: सेहवाग-द्रविड स्वस्तात बाद, पण अर्जुन राजपूतचं खणखणीत शतक; भारताच्या पाकिस्तानविरुद्ध २०० धावा पार

Pimpri Chinchwad Water Cut : रावेतमध्ये नदीतून बेकायदा पाणीउपसा पाणीचोरीवर कारवाईचा बडगा; अनधिकृत यंत्रणा हटविण्याचे आदेश

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला कणकेच्या दिव्याने का ओवाळतात? जाणून घ्या ४ धार्मिक मान्यता

SCROLL FOR NEXT