suraj chavan won bigg boss marathi 5  esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Suraj Chavan Won Bigg Boss Marathi 5 Season Trophy : लोकप्रिय रीलस्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण याने ''बिग बॉस मराठी ५'' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

Payal Naik

गेली कित्येक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. 'बिग बॉस मराठी ५' चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या सोहळ्यात रीलस्टार सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. बारामतीचा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने 'बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे सुरजच्या चाहत्यांचा आनंद अनावर झाला आहे. त्याच्यावर प्रेक्षक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

गुलिगत धोका फेम सुरज हा बारामतीच्या एका छोट्याश्या गावातला मुलगा आहे. रील बनवून टिकटॉकवर सूरजला प्रसिद्धी मिळाली. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पैसे कमावण्यासाठी सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याचा इथवरच प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सुरजने या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावी जाऊन समजूत काढली होती. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे.

'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावे केल्यानंतर आता त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुरजमुळे तळागाळातील प्रेक्षकही 'बिग बॉस मराठी' सारख्या कार्यक्रमाशी जोडला गेला. आता बारामतीकर सुरजचं कसं स्वागत करणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT