suraj chavan esakal
Premier

बिग बॉस जिंकलेल्या सुरज चव्हाणच्या नावावर सुरू आहे धक्कादायक प्रकार; रीलस्टारने पोस्ट करत केली चाहत्यांना विनंती

Suraj Chavan Request To Fans: लोकप्रिय मराठी रीलस्टार सुरज चव्हाण याच्या नावाने सध्या एक धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे.

Payal Naik

बारामतीच्या रीलस्टार सुरज चव्हाण याने 'बिग बॉस माराही ५' मध्ये आपली कमाल दाखवत ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्याने बिग बॉसच्या घरात शेवटी प्रवेश केला होता आणि तोच बिग बॉसच्या घरातून सगळ्यात शेवटी बाहेर पडला. त्याच्या वागण्याने त्याने सगळ्यांना भुरळ घातली. त्याच्यावर महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं आणि अखेर तो या सीझनचा विजेता ठरला. मात्र आता तो आपल्या घरी गेल्यानंतर त्याच्या नावावर सोशल मीडियावर धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या नावाने ऑनलाइन फसवणूक सुरू आहे. त्याच्या नावाने पैसे उकळण्याचं काम काही लोक करत आहेत.

सूरजला पाठिंबा देण्यासाठी काही नेटकऱ्यांनी त्याच्या नावाचे अकाउंट बनवले होते. मात्र आता तो घराबाहेर आल्यानंतर मात्र त्यापैकी काही अकाउंटवरून चाहत्यांची आर्थिक फसवणूक सुरू आहे. सुरजने त्याच्या ऑफिशिअल अकाउंटवरून पोस्ट शेअर करत याबद्दल सांगत चाहत्यांना सतर्क केलं आहे. त्याने पोस्ट करत लिहिलं, 'नमस्ते मी आपल्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. मागील काही तासांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून, त्यामध्ये आम्ही सूरजला आर्थिक मदत करणार आहोत…दिलेला कोड स्कॅन करून पैसे पाठवा. त्याच्यापर्यंत निश्चित ही आर्थिक मदत आम्ही पोहोचवू… अशा पद्धतीच्या या सगळ्या पोस्ट आहेत.'

suraj chavan

त्याने पुढे लिहिलं, 'माझ्या नावाचे फेक आयडी बनवून या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तरी अशा फेक पोस्टला फॅन्सनी बळी पडू नये ही माझी विनंती आहे. जे कोणी अशा पोस्ट शेअर करत आहेत…त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.' यापूर्वीही सुरजला अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागला. त्यामुळेच बिग बॉस जिंकल्यावर रितेश देशमुख याने त्याच्या मदतीसाठी मॅनेजर देणार असल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Accident: रुग्णाला नेताना रुग्णवाहिकाच आजारी; रॉड तुटला, भर उन्हात भाजलेल्या रुग्णाच्या वेदनांत भर!

Drowning Incident: खडकीत आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना, सरपण आणायला गेले अन् तिघांचा जीव गेला..

Kolhapur Accident News : डंपर पंक्चर झाला म्हणून थांबला अन्, जिवावर बेतला; समोर जळत होता पण...

Latest Marathi News Live Update: हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

Cancer Treatment Breakthrough : कर्करोगावर क्रांतीकारी बदल, ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ ऐवजी मिळणार ‘इम्युनोथेरपी’; रुग्णांचे आयुष्य वाढणार

SCROLL FOR NEXT