Bigg Boss Marathi S5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : पायलने राखी बांधल्यावर सुरजने पाया पडून घेतला आशीर्वाद ; प्रेक्षकांनी केलं संस्कारांचं भरभरून कौतुक

Suraj Chavan touches Payal Jadhav feet in Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये अबीर गुलाल मालिकेच्या टीमने हजेरी लावली. यावेळी सुरजच्या कृतीने सगळ्यांचं मन जिंकलं.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Episode : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ सध्या खूप गाजतो आहे. घरातील स्पर्धकांचा गेम, त्यांचा वावर यावर प्रेक्षकांची असणारी प्रतिक्रिया सगळ्यांना पाहायला मिळतेय. काल बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला. यावेळी रितेशने प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या परफॉर्मन्सवरून झापलं.

तर भाऊच्या धक्क्याच्या दुसऱ्या भागात नवीन पाहुणे हजेरी लावणार आहेत. कलर्स मराठीवरील अबीर गुलालची टीम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय केळकर, पायल जाधव आणि गायत्री दातार स्पर्धकांच्या भेटीस येणार आहेत. अक्षय केळकर आणि गायत्री दातार हे बिग बॉस मराठीचे एक्स स्पर्धक होते.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले कि, अबीर गुलालच्या टीमने सदस्यांबरोबर एक गेम खेळला. प्रत्येक स्पर्धकाला घरातील एका स्पर्धकाला विविध नाव द्यायची होती. त्यानंतर पायलने सूरजला राखी बांधली. ते बघून सूरज भावूक झाला आणि त्याने पाया पडून तिचे आशीर्वाद घेतले. सुरजच्या या कृतीचं खूप कौतुक होतंय.

सोशल मीडियावर अनेकांनी सुरजचं भरभरून कौतुक केलं आहे. सूरज खरंच सुसंस्कृत आहे असं अनेकांनी म्हंटल आहे. तर पायल आणि सूरजचा बॉण्ड सगळ्यांना आवडला. अबीर गुलाल टीमबरोबरचा टास्क पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT