Suresh Wadkar sakal
Premier

Suresh Wadkar: वाढदिवशी सुरेश वाडकरांची श्रोत्यांना भेट, गायक येणार चाहत्यांच्या भेटीला! वाचा खास बातमी

Latest Marathi Singer News: बाळू महेंद्र यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सन १९८३ मध्ये आलेल्या या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Latest Marathi entertainment News: प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीलाही उत्तमोत्तम गाणी दिली आहेत. त्यांच्या गुरुकुलात अनेक गायक तयार झाले आहेत. आता नुकताच त्यांनी आपला वाढदिवस सेलिब्रेट केला आणि या दिवशी आपल्या चाहत्यांना त्यांनी अनोखी अशी भेट दिली आहे. "ऐ ज़िंदगी गले लगा ले" नावाचा रेडिओ कार्यक्रमाचा त्यांनी शुभारंभ केला आहे.

"ऐ ज़िंदगी गले लगा ले" हे त्यांनी गायलेले सदमा चित्रपटातील गाणे कमालीचे लोकप्रिय ठरले. संगीतकार इलाई राजाने या गाण्याला संगीत दिले तर गुलजार यांनी ते गीत लिहिले. या चित्रपटामध्ये कमल हसन आणिम श्रीदेवी यांची मुख्य भूमिका होती. बाळू महेंद्र यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सन १९८३ मध्ये आलेल्या या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती.

या चित्रपटातील "ऐ ज़िंदगी गले लगा ले" हे गाणे सुरेश वाडकर यांनी गायले होते. त्यामुळे त्यांनी या गाण्याची प्रेरणा घेऊनच हा रेडिओ कार्यक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाची घोषणा करताना त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांच्यासह या शोचे अँकर कुमार, स्टुडिओ रीफ्यूलचे सीईओ इंडिया चॅप्टर सचिन तैलंग आणि सीईओ दुबई चॅप्टर रमन छिब्बर देखील या वेळी उपस्थित होते.

त्यांनी या वेळी चित्रपट "सदमा" मधील गाणं "ऐ ज़िंदगी गले लगा ले"बद्दल चर्चा केली. त्यांनी या गाण्याच्या रेकॉर्डिंग आणि त्याच्या लोकप्रियतेच्या गोष्टी कथन केल्या. या कार्यक्रमात सुरेश वाडकर आपल्या जीवनातील काही किस्से तसेच कडू व गोड आठवणी सांगणार आहेत. गाण्यांच्या रेकाॅर्डिंगपासून ते संगीतातील अन्य गमतीजमती ते सांगणार आहेत. लवकरच हा कार्यक्रम येणार आहे. त्यांच्या वाढदिवासाची ही अनोखी भेट असणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT