Suyash Tilak Marathi Actor Esakal
Premier

Suyash Tilak: "पैसे न देणाऱ्यांचं..." मराठी अभिनेत्याला मिळाले नाहीत कामाचे पैसे; पोस्ट करत व्यक्त केला संताप

Suyash Tilak Marathi Actor: यासोबतच सुयशने डोक्याला हात मारून घेणारी इमोजीही जोडली आहे. सुयशने त्यामध्ये कुणाचेही नाव घेतले नाही.

आशुतोष मसगौंडे

सुयश टिळक हे मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने कलाक्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. आतापर्यंत तो अनेक मालिका, नाटक, वेबसीरिज आणि चित्रपटांमध्ये झळकला आहे. तो सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय असतो.

नुकतेच त्याने संतप्त प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेअर केली आहे. काम करूनही अद्याप सुयशला त्याच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत पोस्टमधून त्याने संताप व्यक्त केला आहे.

"तुम्ही केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळण्याची अपेक्षा चूक? अशा पैसे न देणाऱ्या, उशिरा देणाऱ्यांचं काय करायचं?" असा सवाल त्याने या पोस्टमधून केला आहे.

यासोबतच सुयशने डोक्याला हात मारून घेणारी इमोजीही जोडली आहे. सुयशने त्यामध्ये कुणाचेही नाव घेतले नाही.

अलीकडेच तो 'अबोली' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या पोस्टला या मालिकेशीसुद्धा जोडले. सुयशने 'पुढचं पाऊल, बापमाणूस, दुर्वा, का रे दुरावा' यांसारख्या मालिकांतून प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले.

सुयश टिळक मराठी अभिनेता असून तो चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये प्रामुख्याने काम करतो. त्याने का रे दुर्वा मधील जयराम खानोलकरची भूमिका साकारत मोठी ओळख मिळवली होती. यासह त्याने बापमाणूस, सख्या रे, दुर्वा आणि शुभमंगल ऑनलाइन मध्ये देखील काम केले आहे.

सुयशने आतापर्यंत एकून आठ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात मराठीसह हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. आतापर्यंत सुयश 14 मालिकांमध्येही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Uttar Pradesh : CM योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा; शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली TET परीक्षेविरूद्ध दाखल करणार पुनर्विचार याचिका

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

SCROLL FOR NEXT