Swapnil children's dance on nach ga ghuma
Swapnil children's dance on nach ga ghuma 
Premier

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

सकाळ डिजिटल टीम

Nach Ga Ghuma Latest Update: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या आगामी 'नाच गं घुमा' या सिनेमाची. कामवाली आणि घरवाली यांच्या कॉम्प्लिकेटेड नात्यावर हा सिनेमा आधारित आहेत. सिनेमाचा ट्रेलर तर सगळीकडे गाजतोच आहे आणि सिनेमाची टीमसुद्धा जोरदार प्रोमोशन करण्यात बिझी आहे. सोशल मीडियावर या सिनेमाचा टायटल ट्रॅकही गाजतोय. अनेकांनी या गाण्याच्या हुक स्टेपवर रील्सही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'नाच गं घुमा' या सध्या गाजणाऱ्या गाण्याची झलक अभिनेता स्वप्नील जोशीच्या दोन्ही मुलांनाही पडली. मायरा आणि राघवने नाच गं घुमाची हुक स्टेप करत या गाण्यावर ठेका धरला. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मायराचा भन्नाट डान्स आणि राघवने तिला दिलेली साथ अनेकांना पसंत पडली.

स्वप्नीलने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओला त्याने,"आमच्या मायरा आणि राघवलाही मोह आवरला नाही !" असं कॅप्शन दिलं आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत मायरा आणि राघवचं कौतुक केलं.

परेश मोकाशी यांनी 'नाच गं घुमा' या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलं असून त्यांची पत्नी मधुगंधा कुलकर्णी हिने या सिनेमाचं सहलेखन केलंय. या सिनेमात मधुगंधा मुक्ता साकारत असलेल्या भूमिकेच्या मैत्रिणीचं पात्र साकारत असून तिने या सिनेमाची निर्मितीही केली आहे. मुक्ता या सिनेमात राणी या करिअर सांभाळून संसाराचा गाडा ओढणाऱ्या गृहिणीची भूमिका साकारतेय तर नम्रता या सिनेमात आशाबाई या मोलकरणीची भूमिका साकारणार आहे.

मोलकरीण आणि गृहिणी यांचं 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशा वेगळ्या नात्याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच या अशा वेगळ्या विषयावर आधारित सिनेमा मराठी सिनेविश्वात बनला आहे. या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सिनेनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतोय. त्याच्यासोबत शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, तेजस देसाई आणि परेश मोकाशी यांनीही हिरण्यगर्भ प्रॉडक्शन या लेबल अंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली आहे. १ मे २०२४ ला महाराष्ट्रातील सगळ्या सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Share Market Closing: लोकसभा निकालापूर्वी शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर; कोणते शेअर्स चमकले?

Pune News : मित्राच्या लग्नाला आले अन् स्वत:च विवाह बंधनात अडकले! जर्मनीच्या जोडप्याचा हिंदू पध्दतीने विवाह सोहळा

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना निकालाआधीच सर्वात मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल

SCROLL FOR NEXT