Swatantra Veer Savarkar movie
Premier

Swatantra Veer Savarkar movie box office collection: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटानं ओपनिंग-डेला किती केली कमाई? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Swatantra Veer Savarkar movie box office collection: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटानं ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Swatantra Veer Savarkar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर'(Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट काल (22 मार्च) रिलीज झाला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा दाखवण्यात आला आहे. चित्रपटात रणदीपनं विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्यानं बरीच मेहनत देखील घेतली आहे. आता या चित्रपटानं ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? जाणून घेऊयात...

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Swatantra Veer Savarkar movie box office collection Day 1)

Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटानं ओपनिंग-डेला 1.15 कोटींची कमाई केली आहे. याचा अर्थ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.

विनायक दामोदर सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्यांचा संघर्ष 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, रणदीप हुड्डा आणि योगेश राहर यांनी केली आहे तसेच रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली आणि पांचाली चक्रवर्ती यांनी या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाची स्टार कास्ट

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात रणदीप हुड्डासोबतच अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीप हुड्डा 30 किलो वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वी रणदीपनं त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

रणदीपनं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की या चित्रपटासाठी त्यानं त्याचं घर विकलं. तो म्हणाला होता, "हा सिनेमा तयार करण्यासाठी मला कोणीही मदत केलेली नाही. या सिनेमासाठी मी माझं घर विकलं आहे. मी हा सिनेमा सावरकरांवर झालेला अन्याय दाखवण्यासाठी बनवला आहे. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT