Swatantra Veer Savarkar Collection eSakal
Premier

Swatantra Veer Savarkar Collection : बॉक्स ऑफिसवर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाची वाईट अवस्था; सहाव्या दिवशीच्या कमाईत मोठी घसरण

Randeep Hooda : रिलीजच्या पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 1.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर वीकेंडचा फायदा घेत रविवारपर्यंत या चित्रपटाने पाच कोटींचा टप्पा गाठला.

Sudesh

Swatantra Veer Savarkar Box Office Collection : रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये सावरकरांची भूमिका रणदीप हुड्डाने केली आहे. या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तितका चालताना दिसत नाहीये.

रिलीजच्या पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 1.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर वीकेंडचा फायदा घेत रविवारपर्यंत या चित्रपटाने पाच कोटींचा टप्पा गाठला. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा याची कमाई कमी होताना दिसून आली. रिलीजच्या पाचव्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाने पुन्हा सुमारे 1.05 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. त्यानंतर आता बुधवारची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. (Swatantra Veer Savarkar)

सॅकनिल्कने दिलेल्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी केवळ 86 लाख रुपयांचा व्यवसाय केला. यानंतर या चित्रपटाचं सहा दिवसांचं एकूण कलेक्शन सुमारे 10 कोटी रुपये झालं आहे. (Swatantra Veer Savarkar Day 6 collection)

रणदीप हुड्डाची मेहनत

मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं एकूण बजेट सुमारे 20 कोटी रुपये होतं. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) तब्बल 32 किलो वजन कमी केलं होतं. तसंच आपलं घरही या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

रणदीप सोबत या चित्रपटात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) देखील प्रमुख भूमिकेत आहे. वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई यांची भूमिका अंकिताने साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

Latest Marathi News Live Update : लखनौमध्ये दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग

SRH vs PBKS : अभिषेक शर्माची वादळी खेळी, मार्को यान्सेनचा 'वन हँड' कॅच... पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले, बरेच काही घडले

"चुकीच्या माणसांमुळे आयुष्यात खूप मोठी किंमत मोजली," सोनाली कुलकर्णीने व्यक्त केली खंत ; म्हणाली…

SCROLL FOR NEXT