Swatantra Veer Savarkar eSakal
Premier

Swatantra Veer Savarkar : रविवारच्या सुट्टीचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाला फायदा की तोटा? किती झालं वीकेंड कलेक्शन?

Savarkar Box Office Collection : सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

Sudesh

Swatantra Veer Savarkar Weekend Collection : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा बायोपिक 22 मार्च रोजी रिलीज झाला होता. या सिनेमामध्ये रणदीप हुड्डा हा स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेत आहे. या फिल्मचं ओपनिंग डे कलेक्शन ठीकठाक होतं. मात्र शनिवार-रविवारच्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाला झाला आहे.

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. रविवारच्या दिवशी या चित्रपटाची कमाई 2.60 कोटी रुपये एवढी होती. एकूणच, तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने एकूण 5.90 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

बजेटच्या तुलनेत कमाई कमीच

मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं बजेट हे सुमारे 20 कोटी रुपये होतं. रणदीप हुड्डाने या चित्रपटासाठी आपलं घरही विकल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्यानेच केलं आहे. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत वीकेंडला झालेली कमाई अगदीच कमी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी त्याने तब्बल 32 किलो वजन घटवलं होतं. रणदीप सोबत या चित्रपटात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) देखील प्रमुख भूमिकेत आहे. वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई यांची भूमिका अंकिताने साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT