Swatantra Veer Savarkar SAKAL
Premier

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Swatantra Veer Savarkar On OTT: थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे.

priyanka kulkarni

Swatantra Veer Savarkar: अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घेऊयात...

'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटातील रणदीप हुडाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटासाठी रणदीपने काही किलो वजनही कमी केले होते. त्याचे हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहिल्यानंतर प्रेक्षक थक्क झाले. आता 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, आता ते प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर घरबसल्या पाहू शकणार आहेत.

स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट वीर सावरकरांच्या 141 व्या जयंतीनिमित्त हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. 28 मे 2024 रोजी ZEE5 वर स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रणदीप आणि अंकिता लोखंडे यांच्याशिवाय या चित्रपटात अमित सियालने गणेश दामोदर सावरकर यांची भूमिका, राजेश खेरा यांनी महात्मा गांधींची भूमिका, लोकेश मित्तल यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीरनं केलं आहे. तसेच त्यानं या चित्रपटाची सहनिर्मिती आणि सहलेखनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

SCROLL FOR NEXT